बंगळुरू सेंट्रल जेलमधील आणखी एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये जेलमधील कैदी दारू पित जंगी पार्टी करताना दिसत आहेत. एकमेकांसोबत आनंद साजरा करत आहेत. कैदी नाचताना आणि गाताना देखील दिसतात. व्हिडिओमध्ये दारूने भरलेले डिस्पोजेबल ग्लास, कापलेली फळं आणि तळलेले शेंगदाणे असलेल्या प्लेट्स दिसत आहेत.
एकंदरीत जेलमध्ये कैद्यांची जंगी पार्टी सुरू असलेली पाहायला मिळत आहे. यापूर्वीही सोशल मीडियावर असेच व्हिडीओ समोर आले आहेत, ज्यामध्ये कैदी जेलमध्ये टेलिव्हिजन पाहताना आणि स्मार्टफोन वापरताना दिसत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बलात्कारातील दोषी उमेश रेड्डी एका क्लिपमध्ये मोबाईल वापरताना दिसत आहे. त्याच्या बॅरेकमध्ये एक टीव्ही सेट बसवण्यात आला होता.
रेड्डीवर अनेक गंभीर आरोप आहेत. जेल अधिकाऱ्यांनी सांगितलं की व्हिडिओची सत्यता पडताळण्यासाठी आणि अशा सुविधा पुरवणाऱ्यांना जबाबदार असलेल्यांची ओळख पटविण्यासाठी चौकशी सुरू करण्यात आली आहे. कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी बंगळुरू सेंट्रल जेलमधील अनियमितता गांभीर्याने घेतली आहे. त्यांनी अतिरिक्त पोलीस महासंचालक बी. दयानंद यांच्याकडून रिपोर्ट मागवला आहे. जर काही त्रुटी आढळल्या तर अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
"मी त्यांना रिपोर्ट सादर करण्यास सांगितलं आहे. जर रिपोर्ट समाधानकारक नसेल तर मी एक स्वतंत्र समिती स्थापन करेन आणि सुधारणात्मक उपाययोजना करेन. मी चुकीचं काम सहन करणार नाही. आता पुरे झालं, कारण अशा घटना पुन्हा घडू नयेत. एडीजीपींना या त्रुटींसाठी जबाबदार अधिकाऱ्यांची ओळख पटवून त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत" असं जी. परमेश्वर यांनी म्हटलं आहे.
Web Summary : A video reveals inmates at Bengaluru Central Jail enjoying a party with alcohol and snacks. This follows previous reports of prisoners using phones and TVs. An investigation is underway, and Karnataka's Home Minister has demanded a report, promising strict action against those responsible for the lapses.
Web Summary : एक वीडियो में बेंगलुरु सेंट्रल जेल के कैदियों को शराब और स्नैक्स के साथ पार्टी करते हुए दिखाया गया है। इससे पहले कैदियों द्वारा फोन और टीवी के इस्तेमाल की खबरें आई थीं। जांच चल रही है, और कर्नाटक के गृह मंत्री ने रिपोर्ट मांगी है, जिसमें चूक के लिए जिम्मेदार लोगों के खिलाफ सख्त कार्रवाई का वादा किया गया है।