लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 18:48 IST2025-06-18T18:48:22+5:302025-06-18T18:48:45+5:30

आरोपी युवक आपल्या प्रेयसीला लग्नाच्या इराद्याने गोव्याला घेऊन गेला होता. मात्र, नंतर युवतीचा मृतदेह मोलेम वन्यजीव अभयारण्यात रस्त्यापासून सुमारे १०० मीटर अंतरावर सापडला.

Bengaluru boyfriend took his girlfriend to Goa for the wedding, but ended the game there! The headstrong lover was arrested | लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

बंगळुरू येथील एका २२ वर्षीय तरुणाने गोव्यात आपल्या प्रेयसीची निर्घृण हत्या केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी युवक आपल्या प्रेयसीला लग्नाच्या इराद्याने गोव्याला घेऊन गेला होता. युवतीचा मृतदेह मोलेम वन्यजीव अभयारण्यात रस्त्यापासून सुमारे १०० मीटर अंतरावर सापडला.

हत्येचा आरोपी संजय केविन एम. (वय २२) असे आहे, जो उत्तर बंगळुरूचा रहिवासी आहे. मृत युवती रोशनी मूसा एम. (वय २२) ही देखील त्याच परिसरात राहत होती. रोशनी कर्नाटकातील एका शाळेत काम करत होती, तर केविन बेरोजगार होता.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
गेल्या सोमवारी गोव्यातील मोलेम वन्यजीव अभयारण्याजवळ एका युवतीचा मृतदेह आढळून आला होता. स्थानिक शेतकरी जंगलात 'बिबेम' (अंकुरित काजू) शोधत असताना त्याला हा मृतदेह दिसला. त्याने तातडीने गोवा पोलिसांना याची माहिती दिली. दक्षिण गोव्याचे एसपी टिकम सिंह वर्मा यांनी सांगितले की, माहिती मिळताच पोलीस पथकाने लगेच तपास सुरू केला. युवतीची ओळख रोशनी मूसा एम. म्हणून पटली. तिच्या शरीरावर अनेक जखमा होत्या. गळ्यावरही खोलवर जखम होती, जी एखाद्या तीक्ष्ण हत्याराने केलेल्या हल्ल्यामुळे झाली होती.

पहिले धागेदोरे कसे मिळाले?
तपासादरम्यान, रोशनीच्या सामानासोबत बसचे एक तिकीट सापडले. यातून तपासकर्त्यांना पहिला महत्त्वाचा धागा मिळाला. दोघेही बंगळूरुहून गोवा कदंब ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनच्या बसने आले होते. त्यांनी येथे एक दिवस थांबण्याची योजना आखली होती. तपासात समोर आले की, बसचे तिकीट आरोपी संजय केविन एम. यानेच बुक केले होते. टिकम सिंह वर्मा यांनी सांगितले की, केविनला मंगळवारी कर्नाटकातील हुबळी येथून अटक करण्यात आली. त्याला चौकशीसाठी गोव्यात आणण्यात आले.

पोलिसांनी काय सांगितले?
चौकशीनंतर पोलिसांनी सांगितले की, रोशनी आणि संजय लग्नासाठी बंगळूरुहून गोव्यात आले होते. याच दरम्यान दोघांमध्ये काही कारणावरून वाद झाला. रागाच्या भरात संजयने रोशनीची हत्या केली आणि तिचा मृतदेह जंगलात फेकून दिला. मात्र, ते एका निर्जन ठिकाणी बसमधून का उतरले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. महिलेचा मृतदेह नंतर रस्त्याच्या कडेला असलेल्या एका जंगली भागात सापडला.

Web Title: Bengaluru boyfriend took his girlfriend to Goa for the wedding, but ended the game there! The headstrong lover was arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.