भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2024 17:52 IST2024-11-27T17:52:10+5:302024-11-27T17:52:41+5:30

आसाममधील एका व्लॉगरची तिच्या बॉयफ्रेंडने हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

bengaluru after killing vlogger boyfriend spent 2 days near her body | भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?

फोटो - ndtv.in

आसाममधील एका व्लॉगरची तिच्या बॉयफ्रेंडने हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्राथमिक तपासात असं दिसून आलं आहे की, मारेकऱ्याने माया गोगोईच्या मृतदेहासोबत बंगळुरूमधील सर्व्हिस अपार्टमेंटमध्ये दोन दिवस घालवले होते. तो मृतदेहासोबतच राहत होता. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. 

ही घटना बंगळुरूच्या इंदिरानगर भागात घडली. आसाममधील एका महिलेचा मृतदेह मंगळवारी येथील अपार्टमेंटमध्ये आढळून आला. पोलिसांनी सांगितलं की, माया गोगोई (१९) हिची केरळमधील कन्नूर येथील रहिवासी आरव (२१) याने चाकूने वार करून हत्या केली. आरव फरार आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरव हा तरुणीला ओळखत होता.

पोलिसांनी सांगितलं की, आरव हा येथील एचएसआर लेआउटमधील लिप्स ओव्हरसीज येथे विद्यार्थी समुपदेशक म्हणून काम करत होता आणि यूट्यूब कन्टेंट क्रिएटर गोगोई ही जयनगरमधील एका खासगी कंपनीत काम करत होती. तरुण गेल्या तीन दिवसांपासून महिलेसोबत अपार्टमेंटमध्ये होता. महिलेचा मृतदेह कुजल्याचं पोलिसांनी सांगितलं.

अपार्टमेंटमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये माया आणि आरव २३ नोव्हेंबर रोजी अपार्टमेंटमध्ये आल्याचं समोर आलं आहे. मायाच्या हत्येनंतर आरव फरार झाला. प्राथमिक तपासाचा हवाला देताना एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, "दोघे २३ नोव्हेंबर रोजी १२.२८ वाजता लॉजमध्ये (सर्व्हिस अपार्टमेंट) दाखल झाले. त्यानंतर आरव सकाळी ८.१९ वाजता लॉजमधून बाहेर पडला."

अधिकाऱ्याने सांगितलं की, मायाची हत्या केल्यानंतर तो मृतदेहासह खोलीतच राहिला. आज मृतदेह अर्धवट कुजलेल्या अवस्थेत सापडला. २० दिवसांपूर्वी जयनगर येथील एका खासगी कंपनीत कामाला सुरुवात केलेली ही तरुणी सहा महिन्यांपूर्वी बंगळुरूला आली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पकडण्यासाठी पथकं तयार करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं.
 

Web Title: bengaluru after killing vlogger boyfriend spent 2 days near her body