लग्नानंतर पती नोकरीसाठी दुसऱ्या शहरात गेला, दिराच्या प्रेमात पडली पत्नी; आपलंच कुंकू पुसलं....
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2023 10:16 IST2023-05-17T10:15:30+5:302023-05-17T10:16:35+5:30
Crime News : या घटनेनंतर पोलिसांनी एक टीम तयार केली आणि हत्येचा छडा लावण्यासाठी चौकशी सुरू केली. एक एक करत माहिती समोर येत गेली आणि नंतर जे समोर आलं त्याचा पोलिसांनाही धक्का बसला.

लग्नानंतर पती नोकरीसाठी दुसऱ्या शहरात गेला, दिराच्या प्रेमात पडली पत्नी; आपलंच कुंकू पुसलं....
Crime News : लग्नानंतर पती दुसऱ्या शहरात काम करण्यासाठी गेला, अशात पत्नी दिराच्या जवळ आली. दोघांमध्ये इतकी जवळीक वाढली की, दोघांना सोबत राहण्याचा निर्णय केला आणि त्यांचे अनैतिक संबंध सुरू झाले. अशात जेव्हा पती परत आला तेव्हा पत्नीने दिरासोबत मिळून पतीला मार्गातून दूर करण्याचा प्लान केला. इतकंच नाही तर त्याची हत्या केली.
बिहारच्या बेगूसरायमधील ही घटना आहे. पोलिसांनी 15 दिवसाआधी झालेल्या शिवम कुमार हत्याकांडाचा खुलासा केला आहे. सोबतच या घटनेतील आरोपी मृत शिवम कुमारचा भाऊ शुभम कुमार, पत्नी चांदनी कुमारी आणि स्थानिक गुन्हेगार राज किशोर याला अटक केली आहे. तसेच या घटनेत वापरण्यात आलेली पिस्तुलही पोलिसांनी ताब्यात घेतली.
या घटनेनंतर पोलिसांनी एक टीम तयार केली आणि हत्येचा छडा लावण्यासाठी चौकशी सुरू केली. एक एक करत माहिती समोर येत गेली आणि नंतर जे समोर आलं त्याचा पोलिसांनाही धक्का बसला. पोलिसांनुसार प्रेम प्रकरणामुळे शिवम कुमारची हत्या त्याचा भाऊ आणि पत्नीने केली. सांगण्यात आलं आहे की, शिवम कुमार गुजरातमध्ये राहून खाजगी कंपनीत काम करत होता आणि कधी कधीच घरी येत होता.
यादरम्यान शिवम कुमारची पत्नी चांदनी कुमारी दीर शुभम कुमार यांच्यात जवळीक वाढली. दोघे प्रेमात पडले. पण यावेळी जेव्हा शिवम कुमार घरी आला तेव्हा तो पत्नी सोबत गुजरातला नेण्याचं म्हणत होता. यामुळे त्याचा भाऊ शुभम कुमार आणि पत्नी चांदनी कुमारी चिडले. अशात त्याच्या हत्येचा प्लान करण्यात आला. प्लाननुसार शिवम कुमारला शुभम कुमार जत्रेत घेऊन गेला. ठरलेल्या जागेवर पैसे पडल्याचं कारण देत शुभम कुमार पैसे शोधू लागला.
दरम्यान, आधीच त्या ठिकाणी लपून बसलेला गुन्हेगार राज किशोर कुमार बाहेर आला आणि त्याने शिवम कुमारवर गोळी झाडली. ही घटना लुटमारी असल्याचं दाखवण्यात आलं. आरोपी त्यांची बाइकही घेऊन फरार झाला. पण पोलिसांनी एक एक करत पुरावे गोळा केले आणि आरोपींना अटक केली. त्यानंतर त्यांनी आपला गुन्हा कबूल केला.