शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

Video : विलेपार्ल्यात विहिरीचा कठडा तुटून एका चिमुकलीसह दोन महिलांचा मृत्यू; 7 महिलांना वाचवण्यात यश

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2018 8:44 PM

याबाबत विलेपार्ले पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. काही महिला विलेपार्ले येथील रुईया बंगलो जवळील विहिरीवर असलेल्या लोखंडी जाळीवर बसून पूजा करत असताना ही दुर्दैवी घटना घडली आहे. 

 मुंबई -  एका धार्मिक कार्यक्रमासाठी काही महिला आज साडेसहा वाजताच्या सुमारास विलेपार्ले येथील रुईया बंगलो, दीक्षित रोड, सॅटेलाईट हॉटेलजवळ जमल्या होत्या. मात्र, या ठिकाणी पूजेचा कार्यक्रम सुरु असताना विहिरीचा कठडा तुटून विहिरीत काही महिला व मुले पडली. त्यानंतर अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस घटनास्थळी पोचले आणि  विहिरीत पडलेल्यांना बाहेर काढले. जखमींना व्ही. एन. देसाई हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात येत आहे. या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. माधवी पांडे (वय - ४९), रेणू  यादव (वय २०) आणि ३ वर्षीय दिव्या अशी मृतांची नावं आहेत. सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे. 

याबाबत विलेपार्ले पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. काही महिला विलेपार्ले येथील रुईया बंगलो जवळील विहिरीवर असलेल्या लोखंडी जाळीवर बसून पूजा करत असताना ही दुर्दैवी घटना घडली आहे. या दुर्घटनेत सात महिलांना वाचविण्यात यश आलं असून अजून काही महिला अडकल्या असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAccidentअपघात