शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
2
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
3
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
4
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
5
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
6
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
7
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
8
बुलढाणा: बापाच्या छातीवर ठेवला पाय, गळा दाबला आणि पाजलं विष; मुलाकडून क्रूरतेचा कळस
9
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
10
"हनुमान चालीसा म्हण", अरबाज निक्कीला देतो सल्ला, गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठीही करतोय मदत
11
Asia Cup 2025 : गोड बोलून संघाबाहेर काढलं? भारतीय क्रिकेटरची कोच गंभीरसंदर्भात 'मन की बात'
12
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!
13
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
14
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
15
गुरुवारी गजानन महाराज स्मरण दिन २०२५: एका दिवसांत कसे कराल ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण?
16
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
17
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
18
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
19
दही की ताक... आरोग्यासाठी सर्वात बेस्ट काय? फायदे समजल्यावर व्हाल चकित
20
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!

ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 16:09 IST

कमाई सुरू झाल्यानंतर निक्कीने तिचा पती विपिनलाही पैसे देणे सुरू केले. हे पैसे विपिन व्यसन आणि मुलींवर उडवत होता.

ग्रेटर नोएडा - निक्की पायला हत्याकांडात रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. त्यात तिच्या मृत्यूचं खरे कारण सासरच्यांचे रुढीवादी विचारसरणी आणि संकुचित मानसिकता असल्याचे सांगितले जाते. लग्नानंतर ६ वर्षापर्यंत निक्कीने तिचे शिक्षण आणि कौशल्य दडपून ठेवले. संसारासाठी पती, सासू, सासरे यांची सेवा केली. कधीतरी त्यांच्या मनातील भावना बदलतील. सून न मानता मुलगी म्हणून त्याच प्रेमाने, स्नेहाने तिला जगता येईल अशी अपेक्षा तिला होती. 

सासरच्यांच्या विचारात कुठलेही बदल झाले नाहीत. ३ वर्षाआधी पती विपिनच्या चारित्र्याबाबत निक्कीच्या कानावर पडले. निक्कीचा मुलगा ५ वर्षाचा झाला होता. वडिलांच्या चारित्र्याचा परिणाम मुलावर होऊ नये असे तिला वाटत होते. त्याच विचाराने ३ वर्षापूर्वी तिने पतीच्या कृत्यांना विरोध सुरू केला. यातूनच जोडप्यांमध्ये वाद सुरू झाला. निक्कीने अखेरच्या श्वासापर्यंत तिचा छळ सुरूच राहिला. 

किती शिक्षण झाले होते?

निक्की आणि तिची बहीण कांचन यांचे बीएपर्यंत शिक्षण झाले होते. लग्नानंतर दोन्ही मुलींना स्वावलंबी व्हायचे होते त्यासाठी त्यांनी ब्यूटीशियनचा कोर्सही केला होता. एकाच घरात सून म्हणून दोघी गेल्या. निक्कीचे लग्न विपिन आणि कांचनचा पती रोहित दोघेही वडिलांच्या पैशावर जगत होते. दोन्ही बहि‍णींना देण्यासाठी पतीसाठी पैसेही नव्हते. बेरोजगार पतीवर ओझं होऊ नये म्हणून दोघींनी आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने पाऊल टाकले. त्यांनी घरातूनच ब्यूटी पार्लर सुरू केले. त्यांचे कौशल्य कामाला आले. दोन्ही बहि‍णींचे काम वाढतच गेले. परिसरातील लग्न समारंभ आणि अन्य आयोजनात महिला ग्राहक मोठ्या प्रमाणात वाढल्या. 

दरम्यान, कमाई सुरू झाल्यानंतर निक्कीने तिचा पती विपिनलाही पैसे देणे सुरू केले. हे पैसे विपिन व्यसन आणि मुलींवर उडवत होता. ३ वर्षाआधी विपिनचे कृत्य निक्कीसमोर आले तेव्हा तिने त्याला पैसे देणे बंद केले. त्यानंतर नशेच्या धुंदीत विपिन निक्कीला कायम मारहाण करत होता. निक्कीने मात्र तिची प्रगती सुरूच ठेवली होती. सोशल मीडियाचा सदुपयोग करत तिने तिचा व्यवसाय वाढवला होता. निक्कीचे इन्स्टाग्रामवर ६४ हजाराहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्यावरूनही विपिनने तिला मारहाण केली आहे. आता निक्कीच्या घरच्यांनी विपिन आणि त्याच्या कुटुंबावर ३५ लाखांची हुंडा मागणी केल्याचा आरोप आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी