किरकोळ कारणावरून पत्नीला मारहाण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 18:39 IST2019-08-09T18:38:23+5:302019-08-09T18:39:27+5:30

पिंपरीतील संत तुकारामनगर येथे गुरुवारी (दि. ८) रात्री साडेआठ ते सव्वानऊच्या दरम्यान हा प्रकार घडला.

beating to wife due to small issues | किरकोळ कारणावरून पत्नीला मारहाण 

किरकोळ कारणावरून पत्नीला मारहाण 

 पिंपरी : किरकोळ कारणावरून बंदुकीच्या लाकडी मुठीने तसेच हाताने पत्नीला मारहाण केली. पतीसह असलेल्या एका महिलेनेही शिवीगाळ करून मारहाण केली. पिंपरीतील संत तुकारामनगर येथे गुरुवारी (दि. ८) रात्री साडेआठ ते सव्वानऊच्या दरम्यान हा प्रकार घडला. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी नीलिमा प्रमोद घाडगे (वय ४०, रा. महेशनगर, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार फिर्यादी नीलिमा यांचे पती प्रमोद छगनराव घाडगे (वय ४५, रा. महेशनगर, पिंपरी) व पूजा प्रकाश वाईकर (वय ४२, रा. महेशनगर, पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी नीलिमा यांचे पती प्रमोद घाडगे पिंपरीतील संत तुकारामनगर येथे गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास गाडीमध्ये आरोपी पूजा वाईकर हिच्याशी बोलत होते. या बाईसोबत आपला काही संबंध नसताना तू तिच्यासोबत का चालला आहे, अशी विचारणा फिर्यादी नीलिमा यांनी त्यांचा पती प्रमोद याला केली. त्यावेळी आरोपी प्रमोद याने त्याच्या हातातील बंदुकीच्या लाकडी मुठीने डाव्या डोळ्याच्या खाली मारले. तसेच आरोपी पूजा वाईकर हिने देखील बंदुकीच्या लाकडी मुठीने हातावर मारून जखमी केले. आरोपी प्रमोद व पूजा या दोघांनी फियार्दी नीलीमा यांना हाताने मारहाणकरून शिवीगाळ केली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: beating to wife due to small issues