Beating a pregnant woman naked | गर्भवती महिलेस विवस्त्र करून मारहाण

गर्भवती महिलेस विवस्त्र करून मारहाण

म्हसवड (जि. सातारा) : घराशेजारी राहणाऱ्या मुलीस दिराबरोबर पळून जाण्यास मदत केल्याचा राग मनात धरून मुलीच्या घरच्यांनी एका २७ वर्षीय विवाहित गर्भवती महिलेला विवस्त्र करून मारहाण केली. माण तालुक्यातील एका गावात ही घटना घडली आहे. याबाबत सहाजणांवर म्हसवड पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. घटनेतील संशयित आरोपी फरार झाले आहेत.
|
माण तालुक्यातील एका गावात २७ वर्षीय महिला तिच्या सासू सासऱ्यांबरोबर राहते. तिचे पती हे नोकरीनिमित्त पुण्यात असतात. या महिलेचा दीर अविनाश बापूराव सांळुखे याने शेजारील संजय तुपे यांच्या मुलीशी महिन्यापूर्वी पळून जाऊन प्रेमविवाह केला आहे. त्यामुळे संजय तुपे व त्यांचे कुटुंबीय संबंधित महिला व तिच्या कुटुंबियांना वारंवार शिवीगाळ करतात. दि. २५ ऑक्टोबर रोजी मीनाक्षी संजय तुपे, साकरूबाई विष्णू तुपे, कल्पना आण्णा तुपे, संतोष विष्णू तुपे, संजय श्रीरंग तुपे, आण्णा श्रीरंग तुपे यांनी तिला मारहाण केली.

हा वाद मिटविण्यास साकरूबाई आणि कल्पना यांनी संबंधित महिलेला तिचा दीर मोहन मोतीराम साळुंखे यांच्याकडे नेले. परत येताना साकरूबाई, कल्पना, मीनाक्षी या तिघींनी तिला ओढत डोंगरावर नेले विवस्त्र करुन मारहाण केली. अंगावर कपडे नसल्याने ही महिला जोराजोरात ओरडू लागली. जवळच्याच शेतात काम करत असलेले या महिलेचे दीर जनार्दन साळुंखे व जानुबाई साळुंखे यांनी तिला कपडे आणून दिले. दरम्यान, तिच्या गळ्यातील दीड तोळ्याचे मंगळसूत्रही तुटून गहाळ झाले आहे.  

Web Title: Beating a pregnant woman naked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.