काकडी घेण्यावरुन मित्राला मारहाण; पुन्हा हेडफोन तुटला म्हणून धमकी

By विलास जळकोटकर | Updated: April 25, 2023 15:33 IST2023-04-25T15:32:38+5:302023-04-25T15:33:08+5:30

भांडण सोमवारी थेट पोलीस ठाण्यापर्यंत गेल आणि मित्रानं मित्राविरुद्ध गुन्हा नोंदला आहे.

beating a friend for taking a cucumber; Threatened again as the headphones broke | काकडी घेण्यावरुन मित्राला मारहाण; पुन्हा हेडफोन तुटला म्हणून धमकी

काकडी घेण्यावरुन मित्राला मारहाण; पुन्हा हेडफोन तुटला म्हणून धमकी

सोलापूर : दोघे रिक्षावाले.. चांगली मैत्रीही. पण अचानक काकडी घेण्याच्या किरकोळ कारणावरुन प्रकरण हाणामारीवरुन गेलं. पुढे हेडफोन तुटला म्हणून मित्रांनं मित्राला पैशाची मागणी केली आणि शिवीगाळ करुन बघून घेण्याची धमकी दिली. हे भांडण सोमवारी थेट पोलीस ठाण्यापर्यंत गेल आणि मित्रानं मित्राविरुद्ध गुन्हा नोंदला आहे.

यातील फिर्यादी लालसाब बुऱ्हाण शेख (वय- ३७, रा. नांदणी, ता. दक्षिण सोलापूर) आणि संशयित आरोपी संतोष पवार (रा. प्रताप नगर तांडा, राजस्वनगर, विजापूर रोड, सोलापूर ) दोघे रिक्षा चालवतात. दोघेही चांगले मित्र. २१ एप्रिल रोजी सैफूल परिसरातील अक्षय बारजवळ दोघे भेटले. येथे त्यांची काकडी घेण्यावरुन बाचाबाची झाली. 

यात संतोषने मारहाण केली. पुन्हा चार दिवसांनी सोमवारी (दि. २४) ८:२५ च्या सुमारास संतोषने फिर्यादी लालसाब याला मागच्या भांडणात माझा हेडफोन तुटला आहे त्याचे पैसे दे नाहीतर तुला बघून घेईन अशी धमकी देऊन शिवीगाळ केली. यावरुन तक्रार नोंदवल्याने गुन्हा नोंदला आहे. तपास फौजदार वाल्मिकी करीत आहेत.

Web Title: beating a friend for taking a cucumber; Threatened again as the headphones broke