गणेशोत्सव मंडळाची सजावट करताना धक्का लागल्याच्या कारणावरून मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 20:14 IST2019-09-03T20:13:32+5:302019-09-03T20:14:34+5:30

तीन जणांनी मिळून संबंधित तरुणाला मारहाण करत जखमी केले...

beaten up for the cause of touch when decorating Ganeshotsav Mandal | गणेशोत्सव मंडळाची सजावट करताना धक्का लागल्याच्या कारणावरून मारहाण

गणेशोत्सव मंडळाची सजावट करताना धक्का लागल्याच्या कारणावरून मारहाण

पिंपरी : सार्वजनिक गणेश मंडळाची सजावट करत असताना तीन अनोळखी व्यक्तींनी एकाला कोणतेही कारण नसताना धक्का मारला. धक्का का मारला, असा जाब विचारला. त्यामुळे तीन जणांनी मिळून संबंधित तरुणाला मारहाण करत जखमी केले. बावधन येथे सोमवारी (दि.२) हा प्रकार घडला. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी महेश बळीराम पवार (वय २४, रा. गणपतीमाथा, वारजे माळवाडी, पुणे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन अनोळखी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
फिर्यादी महेश पवार आणि त्याचे मित्र गणेश मंडळातील गणपतीची सजावट करत होते. त्या वेळी तीन अनोळखी व्यक्ती तेथे आल्या. त्यांनी महेश याला धक्का मारला. धक्का का मारला, असा जाब महेश यांनी विचारला. त्यामुळे चिडून जाऊन त्यांनी महेशला मारहाण करण्यास सुरूवात केली. आरोपींनी रागाने महेशच्या अंगावर धावून जात हातातील वस्तूने मारले. त्यात त्याला गंभीर दुखापत झाली. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.

Web Title: beaten up for the cause of touch when decorating Ganeshotsav Mandal