beat by the rod and koyta a gold chain theft | लोखंडी कोयता, रॉडने मारहाण करून सोनसाखळी लंपास
लोखंडी कोयता, रॉडने मारहाण करून सोनसाखळी लंपास

ठळक मुद्देपिंपरीतील प्रकार; एकास अटक

पिंपरी : लोखंडी कोयत्याल प्रकार; एकाने, रॉडने मारहाण करून जखमी केले. तसेच ६० हजारांची सोनसाखळी हिसकावून नेली. पिंपरीतील गांधीनगर येथील कदम चाळ या परिसरात शनिवारी (दि. ७) हा प्रकार घडला. याप्रकरणी दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच एका आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जावेद साबिर सय्यद (वय २५, रा. खराळवाडी, पिंपरी), भाऊड्या धोत्रे (वय २७), जैद (वय २३, पूर्ण नाव पत्ता माहित नाही), वसिम साबिर सय्यद (वय १९, रा. खराळवाडी), शारीक सय्यद, शानू सय्यद व निखील राजमाने अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी अभिजित माणिक मोरे (वय ३०, रा. खराळवाडी, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यातील आरोपी वसीम सय्यद याला पोलिसांनी अटक केली आहे.
फिर्यादी मोरे यांचा भाऊ शनिवारी कदम चाळ परिसरात उभे होते. आमच्याकडे रागाने बघतो, तुझ्याकडे बघून घेतो, असे म्हणून आरोपी तेथून निघून गेले. त्यानंतर फिर्यादी मोरे त्यांचा टेम्पो पार्क करून घरी पायी जात असताना आरोपी तेथे आले. तुला व तुज्या भावाला दाखवतो, असे म्हणून आरोपींनी लोखंडी कोयता, लोखंडी रॉडने मारहाण करून त्यांना जखमी केले. फिर्यादी मोरे यांचा भाऊ भांडणे सोडविण्यासाठी आला असता त्याला लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी केले. त्यानंतर फियार्दी मोरे यांच्या टेम्पोची काच फोडून नुकसान केले. यात फिर्या$दी यांचा भाऊ अमित मोरे याला लाकडी दांडक्याने मारहाण करून त्यांच्या गळ्यातील ६० हजार रुपये किमतीची सोनसाखळी आरोपींनी हिसकावून नेली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: beat by the rod and koyta a gold chain theft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.