शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

काऊच सर्फिंग वरुन भाडेकरु ठेवताय सावधान..! एटीएम चोरुन पैसे लांबवणाऱ्याला मुंबईतून अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2019 12:29 IST

प्रवाशाला स्वस्तात राहायला जागा मिळावी त्याचवेळी घरमालकाला चार पैसे मिळावेत, यासाठी काऊच सर्फिंग ही वेबसाईट सुरु झाली आहे.

पुणे : प्रवाशाला स्वस्तात राहायला जागा मिळावी त्याचवेळी घरमालकाला चार पैसे मिळावेत, यासाठी काऊच सर्फिंग ही वेबसाईट सुरु झाली आहे. मात्र, अशाप्रकारे घरात राहणाऱ्या एका तरुणाने आजारी ज्येष्ठ नागरिक महिलेचे एटीएम कार्ड चोरुन त्याद्वारे दोन दिवसात तब्बल ९० हजार रुपये लांबविले. अलंकार पोलिसांनी या तरुणाचा मुंबईत तब्बल तीन दिवस माग काढून त्याला बेड्या ठोकल्या.दिवाकर राघव मेहता (वय २५, रा़ जयपूर, राजस्थान) असे त्याचे नाव आहे. या प्रकरणी अश्विन पंडित यांनी अलंकार पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यांनी काऊच सर्फिंग या वेबसाईटवर आपल्या घरी पेइंग गेस्ट ठेवण्याविषयीची माहिती दिली होती. दिवाकर मेहता हा ट्रॅव्हल गाईड म्हणून काम करतो. तो पंडित यांच्याकडे यापूर्वी काही दिवस राहिला होता. त्यानंतर तो काही दिवसांपूर्वी पुन्हा आला. १५ दिवस राहिला. पंडित यांची आई आजारी असून त्या गादीवरुन उठू शकत नाही. पंडित हे दोन दिवस बाहेर गेले होते. त्यांच्या आईचे एटीएम कार्ड त्यांच्या खोलीत होते. बँकेने पाठविलेल्या पाकिटात एटीएम कार्ड व पिननंबर होता. मेहता याच्या ते लक्षात आले. त्याने कार्ड व पाकिट घेऊन त्याद्वारे दोन दिवसांत एटीएममधून ९० हजार रुपये काढले. बँकेतून पैसे काढल्याचा मेसेज आला पण तो आईच्या मोबाईलवर आला.  पंडित बाहेरगावी असल्याने तो कोणी पाहिला नाही. त्यानंतर मेहता निघून गेला. दोन दिवसानंतर पंडित यांच्या लक्षात हा प्रकार आला.त्यांनी अलंकार पोलिसांकडे धाव घेतली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्पना जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक सुरज गोरे व त्यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण करुन मेहता हा मुंबईतील चेंबरमध्ये असल्याची माहिती मिळविली. त्यानंतर पथक तीन दिवस मुंबईत त्याच्या मागावर होते. त्यांनी चेंबूरमधील इंदिरानगरमधून मेहता याला अटक केली़ तेथेही तो पेर्इंग गेस्ट म्हणून रहात होता. तेव्हा काऊच सर्फिंगवरुन भाडेकरु ठेवताना अधिक काळजी घ्या.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीtheftचोरीatmएटीएमPoliceपोलिस