शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

माणुसकीला काळीमा! स्मशानभूमीत झाडाला बांधून तरुणाला बेदम मारहाण, नाक कापण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2021 14:21 IST

Crime News : एका तरुणाचं अपहरण करून त्याला स्मशानभूमीत नेऊन बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली - राजस्थानच्या बारमेरमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. एका तरुणाचं अपहरण करून त्याला स्मशानभूमीत नेऊन बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. स्मशानभूमीतील एका झाडाला बांधून तरुणाला काही अज्ञातांनी गंभीर मारहाण केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपींनी संबंधित तरुणाचं धारदार शस्त्राने नाक कापण्याचाही प्रयत्न केला आहे. या हल्ल्यात पीडित तरुणाच्या नाकाला गंभीर दुखापत झाली असून शरिरीवर अनेक ठिकाणी जखमा झाल्या आहेत. तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानातील बाडमेर जिल्ह्यातील सिंधवास गावात ही भयंकर घटना घडली. गावात राहणाऱ्या एका तरुणाचं काही जणांनी अपहरण केलं होतं. यानंतर आरोपींनी त्याला सरणू येथील स्मशानभूमीत घेऊन गेले, त्याठिकाणी आरोपींनी संबंधित तरुणाला झाडाला बांधलं आणि बेदम मारहाण केली आहे. याप्रकरणाची माहिती मिळताच तातडीने पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तरुणाची सुटका केली. तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार जखमी तरुण हा भलीसर धोरीमन्ना येथील रहिवासी असून कुंम्भाराम असं त्याचं नाव आहे. सरली येथील रहिवासी असलेल्या श्रवणकुमार आणि त्याच्या इतर पाच ते सात साथीदारांनी मिळून तरुणाचं अपहरण केलं. अपहरणानंतर त्याला मारहाण करत सरणू येथील स्मशानभूमीत आणण्यात आलं. येथील एका झाडाला दोरीने घट्ट बांधून त्याला पुन्हा मारहाण केली. यानंतर आरोपींनी धारदार शस्त्राने युवकाचं नाक कापण्याचा प्रयत्न केला आहे. या हल्ल्यात संबंधित तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार केले जात आहेत. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

क्रूरतेचा कळस! दारूसाठी पैसे न दिल्याने कापले पत्नीचे ओठ आणि नाक, घटनेने खळबळ

राजस्थानच्या जोधपूरमध्ये नात्याला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. नशेत असलेल्या पतीने धारदार शस्त्राने आपल्या पत्नीचं नाक आणि ओठ कापल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे दारूसाठी पत्नीने पैसे दिले नाहीत म्हणून नवराने टोकाचं पाऊल उचलत पत्नीवर अशा प्रकारे हल्ला केला आहे. यामध्ये जखमी झालेल्या महिलेला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महिलेने रुग्णालयातूनच पोलिसांना फोन करून या घटनेची माहिती दिली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRajasthanराजस्थानPoliceपोलिस