मुलीकडच्या लोकांनी मोडला साखरपुडा, रागात मुलाकडील लोकांनी कापलं नवरीच्या वडिलांचं नाक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2022 14:19 IST2022-08-11T14:17:31+5:302022-08-11T14:19:02+5:30
Rajasthan News: एक अजब घटना राजस्थानच्या बाडमेरमधून समोर आली आहे. इथे साखरपुडा मोडल्यानंतर तरूणाच्या कुटुंबियांनी मुलीच्या वडिलांचं धारदार शस्त्राने हल्ला करत नाक कापलं.

मुलीकडच्या लोकांनी मोडला साखरपुडा, रागात मुलाकडील लोकांनी कापलं नवरीच्या वडिलांचं नाक
Rajasthan News: लग्नाला फार पवित्र बंधन मानलं जातं . पण लग्नासाठी योग्य जोडीदार निवडणं फार गरजेचं असतं. कुटुंबातील लोक आपल्या मुला-मुलींसाठी चांगला जोडीदार निवडण्यासाठी खूप काही करतात. पण यानंतरही अनेकदा काही कारणांनी नाती तुटतात. अशीच एक अजब घटना राजस्थानच्या बाडमेरमधून समोर आली आहे. इथे साखरपुडा मोडल्यानंतर तरूणाच्या कुटुंबियांनी मुलीच्या वडिलांचं धारदार शस्त्राने हल्ला करत नाक कापलं.
मीडिया रिपोर्टनुसार, ही घटना बाडमेरच्या झापली गावातील आहे. गेल्या बुधवारी मुलाच्या घरच्या लोकांनी मुलीच्या वडिलांवर हल्ला केला. पोलिसांनी सांगितलं की, पीडित कमल सिंह यांना सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
कमल सिंह यांनी हॉस्पिटलमध्ये पोलिसांना सांगितलं की, त्यांनी त्यांच्या मुलीचं लग्न अशा परिवारात जुळवलं होतं जिथे त्यांच्या पुतीणीचं लग्न आधीच झालं होतं. त्यांनी आरोप केला की, त्यांच्या पुतणीची तिच्या सासरच्या लोकांनी हत्या केली होती. त्यामुळे त्यांनी त्यांच्या मुलीची साखरपुडा मोडला.
पोलिसांनी सांगितलं की, परिवारातील जवळपास 10 सदस्यांनी मुलीच्या वडिलांवर काठ्या आणि धारदार शस्त्रांनी हल्ला केला. त्यात त्यांचं नाक कापण्यात आलं. त्यांनी सांगितलं की, याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून चौकशी सुरू आहे.