पाच मुलांची आई आपल्या प्रियकरासोबत फरार, चोरीप्रकरणी पतीलाही पाठवलं होतं तुरूंगात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2022 09:34 IST2022-12-10T09:33:50+5:302022-12-10T09:34:03+5:30
Wife ran away with boyfriend : महिलेचा पती जेव्हा कामाहून घरी परतला तेव्हा त्याची पत्नी घरात नव्हती. तेच कपाटातून दागिने आणि पैसेही गायब होते.

पाच मुलांची आई आपल्या प्रियकरासोबत फरार, चोरीप्रकरणी पतीलाही पाठवलं होतं तुरूंगात
Wife ran away with boyfriend : उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) बरेलीमध्ये 5 मुलांची आई आपला पती आणि मुलांना सोडून पतीसोबत फरार झाली. ती तिच्यासोबत घरातील सगळे दागिने आणि पतीचे पैसे घेऊन गेली. महिलेचा पती जेव्हा कामाहून घरी परतला तेव्हा त्याची पत्नी घरात नव्हती. तेच कपाटातून दागिने आणि पैसेही गायब होते. त्याने आजूबाजूला चौकशी केली, पण काहीच पत्ता लागला नाही. पीडितने पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
बरेलीच्या सीबीगंज भागात राहणाऱ्याने पीडित पतीने सांगितलं की, तो टेम्पो चालवून घराचं पालन पोषण करतो. काही दिवसांआधीच त्याने टेम्पो विकला होता. त्यातील 27 हजार रूपये घरात ठेवले होते. पण पत्नी तेही पैसे घेऊन फरार झाली. त्याने सांगितलं की, त्याच्या पत्नीचा प्रियकर जावेद श्यामगंजमध्ये फळांची गाडी लावतो. पत्नी साधारण 25 दिवसांआधी त्याच्या फरार झाली. त्यांचं अफेअर कधीपासून सुरू होतं याची काही माहिती नाही.
पीडितने सांगितलं की, त्याच्या पत्नीने त्याला चोरीच्या आरोपात तुरूंगात टाकलं होतं. त्यावेळी त्याला पत्नीच्या अफेअरबाबत समजलं होतं. तिच्या वागण्यात कोणताच बदल झाला नाही. काही महिन्यांआधी फसवणूक करून तिने घरही तिच्या नावावर करून घेतलं होतं. आता पीडित न्यायासाठी पोलीस स्टेशनच्या फेऱ्या मारत आहे. पण अजून त्याची पत्नी सापडली नाही.
पीडित म्हणाला की, आम्हाला माहीत नव्हतं की, ती फसवणूक करून घर तिच्या नावावर करत आहे. घर तिच्या नावावर करून घेतल्यावर तिने माझ्यावर चोरीचा आरोप लावला होता. साधारण 14 महिने तुरूंगात राहिल्यानंतर घरी परतला तेव्हा ती घरीच होती. त्यानंतर 25 दिवसांनी 27 हजार रूपये आणि दागिने घेऊन ती फरार झाली.
पीडित म्हणाला की, आम्हाला 5 मुलं आहेत. त्याची पत्नी जावेद नावाच्या तरूणासोबत पळून गेली. त्याला तो कधी भेटला नाही. तो फळांची गाडी लावतो. आम्हाला माहीत नाही, कधी त्याला पाहिलं नाही. मुलं माझ्यासोबत आहेत.