दात काढण्यासाठी डॉक्टरकडे गेली होती महिला, नशेचं इंजेक्शन देऊन केला रेप आणि...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2021 13:50 IST2021-11-08T13:49:56+5:302021-11-08T13:50:43+5:30
UP Crime News : ही घटना सैदपूर भागातील आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सैदपूर हॉकिन्समध्ये राहणाऱ्या प्रॉपर्टी डीलरच्या पत्नीच्या दाताची समस्या होती.

दात काढण्यासाठी डॉक्टरकडे गेली होती महिला, नशेचं इंजेक्शन देऊन केला रेप आणि...
उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) बरेली (Bareilly) जिल्ह्याच्या सैदपूर भागात एका डॉक्टरने आपल्या डेंटल क्लीनिकमध्ये महिलेला नशेचं इंजेक्शन देऊन तिच्यावर रेप केला. यावेळी डॉक्टरने तिला अश्लील व्हिडीओही बनवला. महिलेने आरोप लावला आहे की, तक्रार केली तर व्हिडीओ व्हायरल करण्याची आणि जीवे मारण्याची धमकी दिली. पीडित महिलेच्या तक्रारीवर पोलिसांनी डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल केला आहे. महिलेची मेडिकल टेस्ट केली गेली, टेस्टमधून समोर आलं की, महिलेसोबत रेप झाला आहे.
ही घटना सैदपूर भागातील आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सैदपूर हॉकिन्समध्ये राहणाऱ्या प्रॉपर्टी डीलरच्या पत्नीच्या दाताची समस्या होती. ज्यामुळे ती १६ ऑक्टोबरला प्रकाश डेंटल लॅबमध्ये डॉ.रविंद्र याच्याकडे गेली. डॉक्टर म्हणाला की, दात काढावा लागेल आणि त्याजागी दुसरा लावला जाईल. डॉक्टर रविंद्रने महिलेला आपल्या क्लीनिकवर बोलवलं. महिला जेव्हा क्लीनिकवर पोहोचली तेव्हा तिथे कुणीच नव्हतं. डॉक्टरने गेट बंद करून पडदा लावला. यानंतर महिलेला नशेचं इंजेक्शन देऊन बेशुद्ध केलं. तिचा दात काढला, त्यानंतर महिलेसोबत रेप करत तिचा अश्लील व्हिडीओ काढला.
महिला जेव्हा शुद्धीवर आली तेव्हा तिचे कपडे व्यवस्थित नव्हते. महिलेने याची तक्रार डॉक्टरकडे केली. ज्यावर डॉक्टरने तिला धमकी दिली की, व्हिडीओ व्हायरल करेल. त्यामुळे महिला घाबरली. आपल्या घरी गेल्यावर शांत आणि चिंतेत राहू लागली. ३ नोव्हेंबरला प्रॉपर्टी डीलरने पत्नीला विचारलं तेव्हा तिने डॉक्टरच्या कृत्याबाबत सांगितलं. म्हणाली की, डॉक्टरने तिच्यासोबत रेप करून व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली आहे. आता महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी डॉक्टरवर गुन्हा दाखल केला. पोलीस पुढील कारवाई करत आहेत.