पहिल्या पत्नीची हत्या करून दुसऱ्या पत्नीसोबत फरार झाला पती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2022 18:21 IST2022-06-28T18:21:03+5:302022-06-28T18:21:46+5:30

UP Crime News : दीड वर्षाआधी संतोष कुमारने दुसरं लग्न केलं आणि गावातील घरात तिच्यासोबत राहू लागला होता. यामुळे दोन्ही पत्नींमध्ये तणावाचं वातावरण होतं.

Barabanki husband absconded with second wife after killing first wife | पहिल्या पत्नीची हत्या करून दुसऱ्या पत्नीसोबत फरार झाला पती

पहिल्या पत्नीची हत्या करून दुसऱ्या पत्नीसोबत फरार झाला पती

UP Crime News : उत्तर प्रदेशच्या बाराबंकीमध्ये एका महिलेची हत्या करण्यात आली आहे. हत्येनंतर मृत महिलेचा पती आणि त्याची दुसरी पत्नी फरार झाले. आरोपी संतोष कुमारचं लग्न साधारण 25 वर्षाआधी खिदरापूर गावातील सीलम देवीसोबत झालं होतं. दोघांना एकही अपत्य नव्हतं.

दीड वर्षाआधी संतोष कुमारने दुसरं लग्न केलं आणि गावातील घरात तिच्यासोबत राहू लागला होता. यामुळे दोन्ही पत्नींमध्ये तणावाचं वातावरण होतं. असं सांगितलं जात आहे की, सीलम देवीची बहीण बाराबंकीमध्ये औषधे घेण्यासाठी गेली होती. तिने विचार केला की, बहिणीला भेटून जाऊ. ती गायत्रीपुरमला पोहोचली तर दरवाजा बाहेरून बंद होता.

काजलनुसार, दरवाजा उघडून जेव्हा ती आत गेली तिला तिच्या बहिणीचा मृतदेह दिसला. तिच्या शरीरावर जखमांचे निशाणही होते. मृत महिलेच्या लहान बहिणीने सांगितलं की, दुसरं लग्न केल्यानंतर बहिणीचं आणि तिच्या पतीचं नेहमीच भांडण होत होतं. याच कारणातून त्याने तिच्या बहिणीची गळा आवळून हत्या केली.

हत्येची सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला. पोलीस अधिकारी संजय मौर्य यांनी सांगितलं की, आरोपी पती संतोष कुमार त्याच्या दुसऱ्या पत्नीसोबत फरार आहे. महिलेचा गळा आवळून हत्या केल्याचं दिसलं. पुढील चौकशी सुरू आहे.

Web Title: Barabanki husband absconded with second wife after killing first wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.