शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
2
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
3
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
4
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
5
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
6
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
7
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
8
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
9
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
10
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
11
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
12
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
13
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
14
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
15
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
16
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
17
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
18
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
19
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...

शेतकऱ्याकडून लाच घेणारा बँकेचा अधिकारी सीबीआयच्या जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2021 17:26 IST

CBI taken Action : ट्रॅक्टरचे कर्ज थकविल्याचे प्रकरण : एक दिवस कोठडी

ठळक मुद्देट्रॅक्टर जप्तीची भीती दाखवून सुभाष काशिनाथ राणे (६८,रा.लोंढे, ता.चाळीसगाव) या शेतकऱ्याकडून २० हजाराची लाच घेणारा बँकेचा वसुली अधिकारी प्रशांत विनायकराव साबळे (वय ४२ रा. औरंगाबाद) याला पुणे येथील सीबीआय एसीबीच्या पथकाने मंगळवारी रात्री अटक केली होती.

जळगाव : बँक ऑफ बडोदाकडून ट्रॅक्टरसाठी घेतलेले कर्ज थकीत झाल्याने ट्रॅक्टर जप्तीची भीती दाखवून सुभाष काशिनाथ राणे (६८,रा.लोंढे, ता.चाळीसगाव) या शेतकऱ्याकडून २० हजाराची लाच घेणारा बँकेचा वसुली अधिकारी प्रशांत विनायकराव साबळे (वय ४२ रा. औरंगाबाद) याला पुणे येथील सीबीआय एसीबीच्या पथकाने मंगळवारी रात्री अटक केली होती. दरम्यान, बुधवारी न्यायालयाने त्याला एक दिवसाची कोठडी सुनावली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लोंढे येथील शेतकरी सुभाष काशिनाथ राणे यांनी सन २०१०-११  मध्ये चाळीसगाव येथील देना बॅकेच्या शाखेकडून ट्रॅक्टर घेण्यासाठी ५  लाख रुपये कर्ज घेतले होते. यानंतर त्यांनी कर्जाचा एकही हप्ताभरला नाही. त्यामुळे बँकेचे थकबाकीदार झाले. विशेष म्हणजे बँकेकडून दरम्यानच्या काळात थकबाकीची मागणीही राणे यांच्याकडून करण्यात आली. यानंतर ही बँक ऑफ बडोदा या बँकेत वर्ग झाली. या कर्जाबाबत दहा वर्षानंतर ८ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ८.३०  वाजता बँक ऑफ बडोदा मध्ये कार्यरत वसुली अधिकारी प्रशांत विनायकराव साबळे हा राणे यांच्याकडे आले. त्यांनी बॅक ऑफ बडोदाची कर्ज थकल्याबाबची नोटीस दाखविली. राणे यांनी घेतलेल्या ५ लाखांचे कर्ज आता १३  लाख रुपये झाले असल्याचे सांगत थकबाकी भरली नाही तर ट्रॅक्टर जप्त करण्यात येईल असे सांगितले. यावेळी राणे यांनी ट्रॅक्टर जप्त न करण्याची विनंती साबळे यांच्याकडे केली, तेव्हा राणे यांनी विनंती केल्यावर त्यासाठी दहा हजार रुपये द्यावे लागतील असे सांगितले. यावेळी शेतकरी राणे यांनी नाईलाजाने साबळे यास दहा हजार रुपये दिले.

पुन्हा आला अन‌् जाळ्यात अडकलाशेतकरी राणे यांनी दहा हजार रुपये दिल्यानंतर १२  जानेवारी रोजी वसुली अधिकारी प्रशांत साबळे हा पुन्हा राणे यांच्याकडे आला. यावेळी त्याने ठरलेल्या रकमेपैकी उर्वरीत १०  हजार रुपयांची मागणी केली तसेच कर्जाच्या हप्त्याचे २ लाख रुपये राणे यांना भरावयास सांगितले. तसेच बँकेतील वरिष्ठ अधिकार्‍यांच्या मदतीने १२ लाखांचे कर्ज ५ लाख ४०  रुपयापर्यत कमी करुन देईन असे सांगून त्यासाठी ठरलेल्या रकमेच्या अतिरिक्त आणखी २०  हजार रुपयांची मागणी राणे यांच्याकडे केली. वसुली अधिकारी यांच्याकडून पैशांची मागणी होत असल्याने शेतकरी सुभाष राणे यांनी १२ जानेवारी रोजी प्रशांत साबळे याच्याविरोधात पुणे येथील सीबीआय अंतर्गत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार केली.

आठ दिवस ठोकले तळया तक्रारीनंतर पुणे येथील सीबीआय एसीबीचे पोलीस निरीक्षक महेश चव्हाण यांनी राणे यांनी केलेल्या तक्रारीची पडताळणी केली. तसेच राणे व साबळे यांच्या संभाषणात केलेल्या तक्रारीनुसार तथ्य पथकाला आढळून आले. यासाठी पुणे सीबीआयचे पथक गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यात ठाण मांडून होते. पडताळणी झाल्यानंतर महेश चव्हाण यांच्यासह पथकाने १९ जानेवारी रोजी सापळा रचून चाळीसगाव शहरातून वसुली अधिकारी प्रशांत साबळे यास राणे यांच्याकडून २० हजार रुपयांची लाच स्विकारतांना रंगेहाळ ताब्यात घेतले. यानंतर याप्रकरणी पुणे येथील सीबीआय एसीबीच्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येवून साबळे यास अटक करण्यात आली. बुधवारी त्याला जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता न्या. आर.जे.कटारिया यांनी एक दिवसांची कोठडी सुनावली. सीबीआयतर्फे जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. केतन ढाके यांनी काम पाहिले. दरम्यान संशयित साबळे यास शहरातील एका पोलीस ठाण्यात कोठडीत ठेवण्यात आले आहे.

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरणJalgaonजळगावPoliceपोलिसArrestअटकCBIगुन्हा अन्वेषण विभागFarmerशेतकरीbankबँक