शहरं
Join us  
Trending Stories
1
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
2
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
3
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
4
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
5
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
6
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
7
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
8
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
9
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
10
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
11
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
12
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
13
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
14
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
15
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
16
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
17
WTC Final : गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला तगडी फाईट देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं केली मजबूत संघ बांधणी
18
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
19
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
20
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं

बनवाबनवी उघड, बनावट कागदपत्रांच्या आधारे बँकेला सव्वा कोटीचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2020 17:30 IST

Bank Fraud : पाच वर्षांनंतर गुन्हा दाखल 

ठळक मुद्देप्रमोद मोतीराम वालमांढरे, शितल प्रमोद वालमांढरे (रा. बालाजी नगर) कृष्णकुमार लक्ष्मणराव देशमुख (रा. शंकर नगर) आणि रोशन होरे (रा. प्रतापनगर) अशी आरोपींची नावे आहेत. ही पार्श्वभूमी असताना आरोपी वालमांढरे दांपत्य, देशमुख तसेच होरे या चौघांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे बँकेत कर्ज प्रकरण सादर करून एक कोटी वीस लाख रुपयांची उचल केली आणि ती रक्कम स्वतः वाटून घेतली.

नागपूर : बनावट कागदपत्रांच्या आधारे सव्वा कोटीचे कर्ज उचलून बँकेला गंडा घालणाऱ्या एका चौकडीविरुद्ध सदर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. विशेष म्हणजे, पाच वर्षांपूर्वीच ही बनवाबनवी बँकेच्या लक्षात आल्यानंतरही तक्रार नोंदवण्यात का उशीर झाला, ते स्पष्ट न झाल्यामुळे आश्चर्य वजा संशय व्यक्त केला जात आहे. प्रमोद मोतीराम वालमांढरे, शितल प्रमोद वालमांढरे (रा. बालाजी नगर) कृष्णकुमार लक्ष्मणराव देशमुख (रा. शंकर नगर) आणि रोशन होरे (रा. प्रतापनगर) अशी आरोपींची नावे आहेत. 

आरोपी प्रमोद वालमांढरे आणि त्यांची पत्नी शीतल या दोघांनी २०१३ मध्ये तत्कालीन कार्पोरेशन बँक आणि सध्याच्या युनियन बँक ऑफ इंडिया किंग्स वे शाखेमध्ये गृह कर्ज मिळण्यासाठी अर्ज सादर केला होता. त्यासाठी त्यांनी आवश्यक ते कागदपत्र आणि निर्मलबाई जोशी यांच्या मालमत्तेची कागदपत्रे सादर केली होती. कागदोपत्री पूर्तता केल्यानंतर बँकेने २४ नोव्हेंबर २०१३ ला आरोपी प्रमोद आणि शीतल वालमांढरे या दोघांना एक कोटी, २० लाख रुपयांचे कर्ज मंजूर केले. घराचे विक्रीपत्र झाल्यानंतर गृहकर्जाचा डिमांड ड्राफ्ट मूळ भूखंड मालक आरोपी देशमुख यांच्या नावाने तयार करून देण्यात येईल, असे ठरले होते. त्यानुसार शितल प्रमोद आणि देशमुख या तिघांनी संबंधित घराचे विक्रीपत्र बँकेत जमा केले. त्यानंतर बँकेने एक कोटी, ९ लाख रुपये (डीडी) आरोपी देशमुख याच्या खात्यात जमा केला. तर ११ लाखाची रक्कम घर दुरुस्तीच्या नावाखाली वालमांढरे दांपत्‍याला दिले. घर दुरुस्ती साठी देण्यात आलेल्या रकमेपैकी पाच लाख रुपये वालमांढरे दाम्पत्याने आरोपी देशमुखच्या खात्यात हस्तांतरित केले. दरम्यान, आरोपींना कर्जाची परतफेड दरमहा एक लाख, २० हजार रुपये अशा स्वरूपात परत करायची होती. ठरल्याप्रमाणे ३ जुलै २०१५ पर्यंत आरोपींनी नियमित हप्ते भरले. नंतर मात्र रक्कम भरणे बंद केल्यामुळे ३१ जुलै २०१५ बँकेने आरोपींना नोटीस पाठविली.

प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे बँक व्यवस्थापक आणि कर्मचारी प्रमोद वालमांढरे यांच्या घरी गेले. त्यावेळी बनवाबनवी उघड झाली. ज्या घराची आरोपींनी विक्रीपत्र करून कर्ज उचलले होते, ते घर निर्मलाबाई जोशी यांचे असून त्यांनी १९८८ मध्ये नोंदणीकृत मृत्युपत्र तयार करून प्रदीप भुसारी नामक नातेवाईकांच्या नावे केले होते. तेथे आरोपी रोशन होरे हा भाड्याने रहात होता. २६ जुलै १९९५ ला निर्मलाबाई मृत झाल्यानंतर आरोपी होरे याने बनावट कागदपत्र तयार केले आणि ती मालमत्ता स्वतःच्या नावे करून घेतली. त्यामुळे प्रदीप भुसारी यांनी या मालमत्तेच्या ताब्यासाठी न्यायालयात धाव घेतली. आरोपी होरेविरुद्ध गुन्हाही दाखल केला. ही पार्श्वभूमी असताना आरोपी वालमांढरे दांपत्य, देशमुख तसेच होरे या चौघांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे बँकेत कर्ज प्रकरण सादर करून एक कोटी वीस लाख रुपयांची उचल केली आणि ती रक्कम स्वतः वाटून घेतली.विलंब का?विशेष म्हणजे १९९५ ला ही बनवाबनवी उघड झाली असताना बँकेने पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यास पाच वर्षे का लावले, ते कळायला मार्ग नाही. सदर पोलिसांनी बँक व्यवस्थापक राजेश पांडुरंग गावंडे यांच्या तक्रारीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. उपरोक्त आरोपींची चौकशी केली जात आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजीPoliceपोलिसbankबँकnagpurनागपूर