शहरं
Join us  
Trending Stories
1
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
2
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
3
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
4
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
5
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
6
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
7
सत्ता मिळविण्यासाठी उद्धवसेनेने प्रतिष्ठा घालविली; मुख्यमंत्री शिंदेंची घणाघाती टीका
8
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
9
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
10
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
11
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
12
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
13
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
14
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
15
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
16
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती
17
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
18
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
19
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
20
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक

मॅट्रीमनी साईटवरील ओळखीतून बंगळूरूच्या तरूणीवर औरंगाबादेत अत्याचार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2019 5:35 PM

तरूणीवर लग्नाच्या आमिषाने सावंगीतील शेतात अत्याचार

ठळक मुद्देपाच लाखाचे दागिने आणि २५ हजाराची रोकड घेतली

औरंगाबाद: लग्न जुळवणाऱ्या  संकेतस्थळावर ओळख झालेल्या बंगळुरूच्या तरूणीला लग्नाचे आमिष दाखवून हर्सूल -सावंगी येथील शेतात नेऊन तिच्यावर अनेकदा अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला. याविषयी हर्सूल पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला.

सय्यद अश्फाक इब्राहिम (रा. हर्सूल सावंगी)असे गुन्हा नोंद झालेल्या आरोपीचे नाव आहे. हर्सूल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार अविवाहित तरूणी ही बंगळुरू येथे आई आणि भावासह राहते. तिने लग्न जुळविणाऱ्या एका संकेतस्थळावर तिची प्रोफाईल (माहिती) बनवली होती. ही माहिती वाचून आरोपीने गतवर्षी तरूणीशी संपर्क साधला आणि त्याला ती पसंत असल्याचे म्हणाला. यानंतर तो तिला भेटण्यासाठी बंगळुरूला गेला. यानंतर तुला माझे आई-वडिल आणि घर दाखवितो, असे सांगून तो तिला घेऊन सावंगीतील शेतातील घरी  गेला. तेथे त्याने तिला गुंगी आणणारी गोळी खाण्यास देऊन तिच्यावर अत्याचार केला. याबाबत पीडितेने आक्षेप घेतल्यानंतर आपण लग्न करणारच आहोत,असे सांगून तिची समजूत काढली. यानंतर त्याने तिला बंगळुरूला नेऊन सोडले. फेब्रुवारी २०१९ मध्ये तो तिला बंगळुरूमधून   पुन्हा सावंगीतील शेतात घेऊन गेला आणि गुंगीची गोळी खाण्यास देवून  तिच्यावर अत्याचार केला.आणि तिला त्याने पुन्हा तिच्या गावी नेऊन सोडले. 

काही दिवसानंतर त्याने अचानक पीडितेसोबतचे बोलणे कमी केले. यामुळे पीडितेने त्याला याबाबत विचारले असता तो लग्नाला टाळाटाळ करीत. २२ आॅगस्ट रोजी त्याने तिला फोन करून हा शेवटचा कॉल असल्याचे सांगितले. तिला शिवीगाळ करून  लग्नास नकार दिला. आरोपीने आपला विश्वासघात केल्याचे लक्षात येताच पीडितेने थेट औरंगाबादेत येवून हर्सूल ठाण्यात तक्रार नोंदविली. हा गुन्हा फुलंब्री ठाण्याकडे वर्ग केला जात आहे.

पाच लाखाचे दागिने आणि २५ हजाराची रोकड घेतलीएप्रिल महिन्यात तो बंगळुरूला गेला. तेथे त्याने खरेदीच्या बहाण्याने तिला बाजारात नेले. तेथे त्याने तिला लग्नापूर्वी आपल्यासाठी एक घर खरेदी करायचे असल्याचे म्हणाला. याकरीता पैसे कमी पडत आहे, तुझ्याजवळील पैसे आणि दागिने दे, लग्नानंतर तुला सर्व परत करतो, असे त्याने तरूणीला सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेवून तिने त्याला रोख २५ हजार रुपये आणि ५ लाखाचे सोन्याचे दागिने दिले. हा ऐवज घेऊन तो औरंगाबादला आला.