दणका! अभिनेत्रींची चौकशी करणाऱ्या दोन अधिकाऱ्यांचे केले निलंबन
By पूनम अपराज | Updated: December 3, 2020 22:31 IST2020-12-03T22:31:19+5:302020-12-03T22:31:19+5:30
Suspension : अभिनेत्री दीपिका पादुकोण, कॉमेडियन भारती सिंह आणि दीपिकाची एक्स मॅनेजर करिष्मा प्रकाश यांची चौकशी करणाऱ्या दोन एनसीबीच्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे.

दणका! अभिनेत्रींची चौकशी करणाऱ्या दोन अधिकाऱ्यांचे केले निलंबन
अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील ड्रग्स प्रकरण चांगलचं चर्चेत आलं आहे. त्यामुळे अनेक दिग्ग्ज कलाकारांचा या प्रकरणात सहभाग असल्याचं देखील समोर आलं आणि एनसीबीने त्यांची चौकशी देखील केली. याप्रकरणी एनसीबीने अभिनेत्री रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शोव्हिकसह अनेकांना अटक केली होती. तर दुसरीकेडे एनसीबीच्या दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. अभिनेत्री दीपिका पादुकोण, कॉमेडियन भारती सिंह आणि दीपिकाची एक्स मॅनेजर करिष्मा प्रकाश यांची चौकशी करणाऱ्या दोन एनसीबीच्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे.
एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी ही कारवाई केली आहे. शिवाय या दोन्ही अधिकाऱ्यांची चौकशी करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत. दरम्यान भारती सिंह आणि तिचा पती हर्षला ड्रग्स प्रकरणी अटक करण्यात आली होती. सध्या त्यांची जामीनावर सुटका झाली आहे. मात्र, जामीन मिळू नये म्हणून संबंधित अधिकाऱ्यांनी हवं तसं तपासकाम केलं नाही. तसेच ते न्यायालयात देखील उपस्थित न राहीले नाहीत. शिवाय आरोपींना मदत केल्याचा देखील त्यांच्यावर संशय आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात असून याप्रकरणी अधिक चौकशी करण्यात येणार आहे.