प्रेयसीसोबत असताना 'त्याने' आधीच्या पत्नीला लावला फोन, रक्ताच्या थारोळ्यात सापडला त्याचा मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2022 15:48 IST2022-01-15T15:44:07+5:302022-01-15T15:48:17+5:30
Bali Murder : महिलेने तिच्या प्रियकराची तेव्हा हत्या केली जेव्हा तो ब्रिटनमध्ये आपल्या परिवारासोबत व्हिडीओ कॉलवर बोलत होता. पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे.

प्रेयसीसोबत असताना 'त्याने' आधीच्या पत्नीला लावला फोन, रक्ताच्या थारोळ्यात सापडला त्याचा मृतदेह
एका ब्रिटीश (British Man) तरूणाची आधी त्याच्या गर्लफ्रेन्डने हत्या केली, मग त्याची हत्या आत्महत्या दाखवण्याचा प्रयत्न केला. पण ती यात यशस्वी ठरू शकली नाही. महिलेने तिच्या प्रियकराची तेव्हा हत्या केली जेव्हा तो ब्रिटनमध्ये आपल्या परिवारासोबत व्हिडीओ कॉलवर बोलत होता. पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे.
'डेली स्टार' च्या रिपोर्टनुसार, ४८ वर्षीय मॅट हार्परची त्याची प्रेयसी एमी पाकपहनने चाकूने वार करत हत्या केली. दोन मुलांचा वडील हार्पर लक्झरी हॉटेल फर्म 'कर्मा' साठी काम करत होता आणि हत्येवेळी घटस्फोटीत पत्नी आणि मुलांसोबत व्हिडीओ कॉलवर बोलत होता. प्रेयसीच्या उपस्थितीत त्याने केलेली ही एक चूक त्याच्या जीवावर बेतली. एमी मूळची इंडोनेशियाची आहे. पण काही काळापासून अमेरिकेत राहते.
मॅटच्या हत्येनंतर एमीने त्याची हत्या आत्महत्या दाखवण्यासाठी प्रयत्न केला. तिने मॅटचा मरतानाचा व्हिडीओ काढला आणि स्वत: ओरडत ओरडत म्हणत राहिली की, 'माहीत नाही काय झालं, कुणी मदत करा'. एमीने हा व्हिडीओ ऑनलाइनही पोस्ट केला होता. जेणेकरून लोकांची तिला सहानुभूती मिळाली. प्रेयसीने प्रियकराची हत्या तिच्या बाली येथील घरात केली.
मॅट हार्परचे बालीमध्ये आणखी एका महिलेसोबत संबंध होते. तिने पोलिसांना सांगितलं की, एमीआधी मॅट तिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होता. काही दिवसांपूर्वी त्याने मला मेसेज करून सांगितलं होतं की तो एमीसोबत आनंदी नाहीये. त्याने मला माफी मागत सांगितलं होतं की एमीने त्याचं लाइफ उद्ध्वस्त केलंय. तेच एमी पाकपहनच्या काही मित्रांनी तिला सायको गर्लफ्रेन्ड म्हटलं. ते म्हणाले की, एमी एक सीरिअल स्कॅमर आहे आणि तिने पैशांचे अनेक फ्रॉड केले आहेत.