प्रमोद रायसोनीसह १४ जणांचे ७५ गुन्ह्यात जामीन अर्ज फेटाळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2021 20:03 IST2021-02-12T20:02:10+5:302021-02-12T20:03:12+5:30

Bail Rejected : बीएचआर : ३ मार्चपासून नियमित कामकाज

Bail applications of 14 persons including Pramod Raisoni were rejected in 75 cases | प्रमोद रायसोनीसह १४ जणांचे ७५ गुन्ह्यात जामीन अर्ज फेटाळले

प्रमोद रायसोनीसह १४ जणांचे ७५ गुन्ह्यात जामीन अर्ज फेटाळले

ठळक मुद्दे न्या.आर.एन.हिवसे यांच्या न्यायालयात राज्यभरातील ८१ गुन्ह्यांचे कामकाज वर्ग करण्यात आले आहे.

जळगाव : बीएचआर पतसंस्थेत सभासदांच्या पैशांचा अपहार व फसवणूक केल्याच्या राज्यभरातील ७५ गुन्ह्यात संस्थापक चेअरमन प्रमोद रायसोनीसह १३ संचालक व १ कर्मचारी अशा १४ जणांचा जामीन अर्ज शुक्रवारी न्यायालयाने फेटाळून लावले. न्या.आर.एन.हिवसे यांच्या न्यायालयात राज्यभरातील ८१ गुन्ह्यांचे कामकाज वर्ग करण्यात आले आहे. ३ मार्चपासून न्यायालयात आता नियमित कामकाज होणार आहे.


 बीएचआरचा संस्थापक चेअरमन प्रमोद भाईचंद रायसोनी (५५,रा.बळीराम पेठ, जळगाव), दिलीप कांतीलाल चोरडीया (५१), सूरजमल भबुतमल जैन (५०),दादा रामचंद्र पाटील (६६), भागवत संपत माळी (६३), राजाराम काशिनाथ कोळी (४७), भगवान हिरामण वाघ (६०), यशवंत ओंकार जिरी (६०)शेख रमजान शेख अब्दुल नबी मन्यार (५५),सुकलाल शहादू माळी (४५)ललीताबाई उर्फ लता राजू सोनवणे (३९) सर्व रा.तळेगाव, ता.जामनेर, मोतीलाल ओंकार जीरी (५०,रा.शेळगाव, ता.जामनेर), डॉ.हितेंद्र यशवंत महाजन (५२,रा.बेंडाळे नगर, प्रेम नगर, जळगाव) व इंद्रकुमार आत्माराम ललवाणी (४०,रा.महाबळ, जळगाव)यांच्याविरुध्द राज्यभरात ८१ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. त्यातील सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस येथील गुन्ह्यात ४ खासगी दावे तेथील न्यायालयात दाखल करण्यात आले आहेत.

Web Title: Bail applications of 14 persons including Pramod Raisoni were rejected in 75 cases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.