बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला; पुरेसे पुरावे असल्याचे सांगत विशेष न्यायालयाचा निर्णय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 06:17 IST2026-03-14T06:16:07+5:302026-03-14T06:17:05+5:30

राज्याचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीला मुंबईतील विशेष न्यायालयाने जामीन देण्यास नकार दिला.

Bail application of accused in Baba Siddiqui murder case rejected; Special court rules that there is sufficient evidence | बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला; पुरेसे पुरावे असल्याचे सांगत विशेष न्यायालयाचा निर्णय 

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला; पुरेसे पुरावे असल्याचे सांगत विशेष न्यायालयाचा निर्णय 

मुंबई : राज्याचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीला मुंबईतील विशेष न्यायालयाने जामीन देण्यास नकार दिला. आरोपीविरोधात  संघटित गुन्हेगारी टोळीला मदत केल्याचे तसेच खुनाच्या कटात सहभाग दर्शविणारे पुरेसे पुरावे उपलब्ध असल्याचे न्यायालयाने जामीन नाकारताना म्हटले.

विशेष मकोका न्यायालयाचे न्या. महेश जाधव यांनी आरोपी भगवान सिंग याचा  जामीन अर्ज फेटाळला.  दीर्घ काळ तुरुंगात असल्याच्या कारणावरून जामीन देण्याची मागणी त्याने केली होती. मात्र, या २०२४ च्या प्रकरणात आरोप निश्चित  झाले असून, खटला सुरू करण्यासाठी सरकारी पक्षाने पावले उचलली आहेत, त्यामुळे खटल्यातील विलंबाचा मुद्दा ग्राह्य धरता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांची  तीन हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. अटक आरोपी भगवान सिंग याने  आपण निर्दोष असून, खोट्या पद्धतीने यात गोवल्याचा दावा करत जामीन मागितला होता. 

Web Title : बाबा सिद्दीकी हत्याकांड: आरोपी की जमानत सबूतों के आधार पर खारिज

Web Summary : मुंबई कोर्ट ने बाबा सिद्दीकी हत्याकांड के एक आरोपी की जमानत याचिका खारिज कर दी। कोर्ट ने कहा कि उसके संगठित अपराध और हत्या की साजिश में शामिल होने के पर्याप्त सबूत हैं। लंबी कैद की उसकी याचिका खारिज कर दी गई क्योंकि मुकदमा शुरू होने वाला है।

Web Title : Baba Siddique Murder Case: Accused's Bail Rejected Citing Evidence

Web Summary : Mumbai court denied bail to an accused in Baba Siddique's murder case. Sufficient evidence links him to organized crime and the murder plot, the court stated. His plea citing prolonged imprisonment was dismissed as the trial is set to begin.