शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
2
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
3
आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
4
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
5
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
6
Astro Tips: मनासारखा जोडीदार नशिबात आहे की नाही हे कसे ओळखावे? ज्योतिष शास्त्रानुसार... 
7
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
8
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
9
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
10
अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय?
11
"तुम्ही धर्मेंद्र यांच्या घराबाहेरुन..." पापाराझींना पाहताच पहिल्यांदाच वैतागला रोहित शेट्टी, काय म्हणाला?
12
"नौगाम पोलीस ठाण्यात झालेला ब्लास्ट केवळ...! मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता"; काय म्हणाले JK पोलीस?
13
३१४ लेखी तक्रारी, १२७ ई-मेल, ४१ जनहित याचिका; १३ वर्षांच्या उदासीनतेने ४७ अपघातांत ६८ बळी
14
'एका माणसाची किंमत ५ लाख, लाज वाटली पाहिजे', संतप्त नातेवाईकांचा सरकारवर जहाल हल्ला
15
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
16
बिहारमध्ये ऐतिहासिक विजय, भाजपाची आता किती राज्यात सत्ता? मोदी-शाह यांचे पुढील टार्गेट ठरले…
17
IPL 2026 Player Trade Updates : टीम इंडियाच्या 'लाला'सोबत खेळताना दिसणार सचिन तेंडुलकरचा 'लाल'
18
उत्पत्ती एकादशी २०२५: नशिबात जे नाही तेही मिळवायचे असेल तर काय करावे? प्रेमानंद महाराजांनी दिले उत्तर
19
‘नोटा’पेक्षाही कमी, स्वबळाचे तीनतेरा; बिहारमध्ये अजित पवारांच्या १६ उमेदवारांना किती मते?
20
गुंतवणूक करण्यापूर्वी समजून घ्या रेग्युलर आणि डायरेक्ट म्युच्युअल फंडातील फरक, नक्कीच येईल कामी
Daily Top 2Weekly Top 5

दागिने घालून जिममध्ये जायची सून, अद्दल घडवण्यासाठी सासूने रचला कट; लोकेशन पाठवलं अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 14:44 IST

सुनेच्या सवयीमुळे सासू रेखा नाराज झाली. कालांतराने तिचा राग इतका वाढला की, रेखाने एक भयंकर प्लॅन केला. 

उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यातील पुरकाजी पोलीस स्टेशन हद्दीतील मोहम्मदपूर गावात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आधुनिक विचारसरणीची आणि फिटनेसवर प्रेम करणारी सून पूजा दररोज जिमला जायची. मात्र जिमला जाताना ती कानातले, अंगठ्या, चेन आणि इतर दागिने घालत असे. सुनेच्या या सवयीमुळे तिची सासू रेखा नाराज झाली. कालांतराने तिचा राग इतका वाढला की, रेखाने एक भयंकर प्लॅन केला. 

सासुला वाटलं की, तिच्या सुनेमध्ये दिखाऊपणा, अहंकार आणि ढोंगीपणा आहे. रेखाने सुनेला चांगलाच धडा शिकवण्यासाठी गुन्हेगार अंकुर उर्फ ​​काशीशी संपर्क साधला आणि तिच्या सुनेचे दागिने चोरण्याचे काम त्याला दिलं. अंकुरने या प्लॅनमध्ये त्याचे दोन साथीदार वंश आणि वीर सिंह यांना सामील केलं. एसएसपी मुझफ्फरनगर संजीव कुमार वर्मा यांनी सांगितलं की, सुरुवातीला पूजा नावाच्या महिलेने घटना घडल्याची माहिती मिळाली. 

तपासात असं दिसून आलं की, ही केस सासू आणि सुनेमधील वादाशी संबंधित आहे. सासूने तिच्या सुनेचं लोकेशन तिच्या ओळखीच्या एका गुन्हेगाराला दिलं आणि त्याला गुन्हा घडवण्याच्या सूचना दिल्या. पूजा जिमला जात असताना सासून तिचं लोकेशन अंकूरला पाठवलं. त्यानंतर गुन्हेगारांनी तिला गाठलं आणि पुजाचे कानातले, अंगठ्या, चेन आणि इतर दागिने हिसकावले. 

घटनेची माहिती मिळताच पुरकाजी महिला पोलीस पथकाने तात्काळ कारवाई केली. १२ तासांच्या आत, वंश, अंकुर आणि वीर सिंह या तिघांना अटक करण्यात आली आणि चोरीचे दागिने जप्त करण्यात आले. सासूनेच सुनेला अद्दल घडवण्यासाठी हा धक्कादायक कट रचला होता. या घटनेने पोलीसही हैराण झाले. जेव्हा या घटनेमागचं सत्य सर्वांसमोर आलं तेव्हा सर्वांनाच मोठा धक्का बसला.  

English
हिंदी सारांश
Web Title : Mother-in-law's jewelry theft plot to teach gym-going daughter-in-law lesson.

Web Summary : In Uttar Pradesh, a mother-in-law, upset by her daughter-in-law's jewelry-wearing habit at the gym, plotted a theft. She shared the daughter-in-law's location with criminals, who then stole her jewelry. Police arrested the culprits and recovered the stolen items.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेशtheftचोरी