उत्तर प्रदेशच्या आझमगड जिल्ह्यातील अहरौला पोलीस ठाण्याच्या हद्दीतून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एक व्यक्ती सातवं लग्न करण्याची तयारी करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या लग्नाला विरोध करणारा दुसरा तिसरा कोणी नसून त्या व्यक्तीचाच अल्पवयीन मुलगा आहे. मुलाने पोलीस ठाण्यात तक्रार करून पोलिसांना हस्तक्षेप करण्याची आणि वडिलांचं लग्न थांबवण्याची विनंती केली आहे. "बाबा सातव्यांदा लग्न करत आहेत, त्यांना थांबवा" असं म्हटलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अहरौला परिसरातील ५५ वर्षीय अमरजीत मौर्य यांनी आतापर्यंत सहा लग्न केली असून आता ते सातव्या लग्नाच्या तयारीत असल्याचा आरोप आहे. अमरजीत यांचा अल्पवयीन मुलगा शनी मौर्य याने पोलिसांना सांगितलं की, वडिलांनी त्याच्या आईसोबत तिसरं लग्न केलं होतं. त्यापूर्वी त्यांनी दोन लग्न केली होती आणि आईनंतरही त्यांनी लग्न केलं.
शनी मौर्यने दिलेल्या माहितीनुसार, अमरजीत मौर्य यांनी २०२४ मध्ये सहावं लग्न केलं होतं. काही काळ सर्व काही सुरळीत चाललं, मात्र त्यानंतर पत्नीने जमीन नावावर करण्याची मागणी सुरू केली. जेव्हा जमीन नावावर केली नाही, तेव्हा तिने दागिने मागितले आणि वाद वाढल्यावर ती घर सोडून निघून गेली. मुलाचा आरोप आहे की, आता वडील सातव्या लग्नाची तयारी करत आहेत आणि त्यासाठी जमीन विकण्याबाबतही बोलत आहेत.
वडिलांनी लग्नाच्या नावाखाली एका व्यक्तीकडून सुमारे ५० हजार रुपये एडव्हान्स घेतले आहेत. कुटुंबाची निम्म्याहून अधिक जमीन आधीच गहाण ठेवली आहे. शनी बारावीचा विद्यार्थी असून वडिलांचं कर्ज फेडण्यासाठी त्याला मजुरी करावी लागत आहे. परीक्षेसाठी तो नुकताच घरी परतला असता, त्याला वडिलांच्या सातव्या लग्नाच्या तयारीबद्दल माहिती मिळाली.
या प्रकरणामुळे गावातही मोठी चर्चा सुरू आहे. गावतील शत्रुघ्न कनोजिया यांनी सांगितलं की, अमरजीत मौर्य याने यापूर्वी अनेकदा लग्न केलं असून हे प्रकरण परिसरात चर्चेचा विषय बनलं आहे. याच दरम्यान, अहरौला पोलीस अधिकारी अमित कुमार मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाकडून तक्रार मिळाली असून प्रकरणाचा तपास सुरू आहे. पोलीस दोन्ही बाजूंची चौकशी करत असून तपासाच्या आधारे पुढील आवश्यक कारवाई केली जाईल.
Web Summary : U.P. teen seeks police help to prevent his father's seventh marriage. Burdened by debt, the father plans to sell land, already heavily mortgaged, for the wedding. The son is already working to pay off his father's debts.
Web Summary : उत्तर प्रदेश में कर्ज से परेशान बेटे ने पिता की सातवीं शादी रोकने के लिए पुलिस से मदद मांगी। पिता शादी के लिए जमीन बेचने की योजना बना रहा है, जो पहले से ही गिरवी रखी हुई है। बेटा पहले से ही कर्ज चुकाने के लिए काम कर रहा है।