शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

भयंकर! सहा वाहनांच्या विचित्र अपघातात तिघांचा जागीच मृत्यू तर दोनजण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2021 15:31 IST

Accident Case : दुर्दैवाने गेल्या काही दिवसांमध्ये याच पट्ट्यामध्ये दोन ते तीन अपघात होऊन पाच जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.            

ठळक मुद्देटेम्पो चालक अक्रम आणि कारमधील इर्शाद सिद्दिकी (३१. रा. बांद्रा पश्‍चिम) रोनक मोरदानी (२७ रा. खार,मुंबई) अशी मृतांची नावे आहेत.

नितीन भावे                                                                                                                                                                                                                                                                                                                                                               

खाेपाेली  :  मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गावर सहा वाहने एकमेकांवर आदळून झालेल्या भीषण अपघातामध्ये तीघांचा जागीच मृत्यू झाला, तर दाेनजण जखमी झाले आहेत. सदरचा अपघात आज सकाळी पावने सहाच्या सुमारास झाला. जखमींवीर खाेपाेली रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. टेम्पो चालक अक्रम आणि कारमधील इर्शाद सिद्दिकी (३१. रा. बांद्रा पश्‍चिम) रोनक मोरदानी (२७ रा. खार,मुंबई) अशी मृतांची नावे आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोंबडी वाहून नेणाऱ्या टेम्पोने भाजी वाहून नेणाऱ्या टेम्पो ला मागून जोरदार धडक दिली. त्यानंतर भाजी वाहून नेणारा टेम्पो हा कारवर जोरदार धडकला. त्यानंतर कोंबडी वाहून नेणारा टेम्पो हा पुन्हा ट्रेलरला आणि दाेन बसलाही धडकला.  त्यामध्ये तिघांचा मृत्यू झाला. जखमींना खोपोली नगर पालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कार मधील मृत व्यक्तींच्या मोबाईल वरून त्यांच्या नातेवाईकांना संपर्क करण्यात आला. या अपघातामुळे एक्सप्रेस वेवर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. एक्सप्रेस वेवर किलाेमिटर 39 येथे रस्त्याचे काम सुरु असल्यामुळे चालकाला अंदाज न आल्यामुळे हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे.

अपघाताचे वृत्त समजताच बोरघाट पोलीस, डेल्टा फोर्स, देवदूत यंत्रणा, 'अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी' या संस्थेचे सदस्य यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन  मृतदेह बाजूला काढले त्यानंतर अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.                                                                                                                                                                             किलोमीटर ३९ जवळ सातत्याने अपहात हाेत आहेत. अपघातांची संख्या पाहता त्याला आळा बसावा म्हणून या ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर एक लेन ३ किलोमीटर बंद करण्यात आली आहे. परंतु दुर्दैवाने गेल्या काही दिवसांमध्ये याच पट्ट्यामध्ये दोन ते तीन अपघात होऊन पाच जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.            

 

टॅग्स :AccidentअपघातPoliceपोलिसDeathमृत्यूMumbaiमुंबईPuneपुणेhighwayमहामार्ग