अश्लील शेरेबाजीप्रकरणी रिक्षाचालकाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2019 18:43 IST2019-04-05T18:41:10+5:302019-04-05T18:43:08+5:30
या प्रकरणी बांगुरनगर पोलिसांनी एका रिक्षाचालकाला अटक केली.

अश्लील शेरेबाजीप्रकरणी रिक्षाचालकाला अटक
मुंबई - मित्रासोबत उभ्या असलेल्या तरुणीला पाहून अश्लील शेरेबाजी करण्याचा प्रकार मालाडमध्ये घडला. या प्रकरणी बांगुरनगर पोलिसांनी एका रिक्षाचालकाला अटक केली. मालाड पश्चिमच्या इनआॅरबीट मॉलच्या मागे हा प्रकार घडला. या ठिकाणी असलेल्या खाडी परिसरात एक तरुणी तिच्या मित्रासोबत गप्पा मारत उभी होती. त्या वेळी एक रिक्षा त्यांच्याजवळ येऊन थांबली. त्या वेळी रिक्षाचालकाने मुलीला इशारा करीत जवळ बोलावले. मुलगी त्याच्याजवळ जाताच ‘त्याच्याजवळ काय आहे? कधीतरी आमच्याजवळ येऊनपण बस,’ असे तो तिला म्हणाला. त्यावरून त्यांच्यात भांडण सुरू झाले. अखेर याबाबत पोलीस नियंत्रण कक्षावर तक्रार करण्यात आली. बांगुरनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता तरुणीने घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला.