रिक्षाचालकाचा दगडाने ठेचून खून, लातूर-औसा महामार्गावरील घटना

By राजकुमार जोंधळे | Updated: October 8, 2023 21:06 IST2023-10-08T21:06:20+5:302023-10-08T21:06:39+5:30

औसा पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Auto driver stoned to death, incident on Latur-Ausa highway | रिक्षाचालकाचा दगडाने ठेचून खून, लातूर-औसा महामार्गावरील घटना

रिक्षाचालकाचा दगडाने ठेचून खून, लातूर-औसा महामार्गावरील घटना

राजकुमार जाेंधळे, औसा (जि. लातूर): एका ४२ वर्षीय ऑटाेचालकाचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची घटना लातूर-औसा महामार्गावरील खडी केंद्रानजीक रविवारी सकाळी उघड झाली. याबाबत औसा पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ईस्माईल मुबारक मणियार (वय ४२, रा. हरंगुळ बु. ता. लातूर, ह.मु. इंडियानगर, लातूर) असे मृताचे नाव आहे.

पाेलिसांनी सांगितले, लातूर-औसा महामार्गावरील कारंजे खडी केंद्रानजीक रस्त्याच्या डाव्या बाजूला ईस्माईल मुबारक मणियार या ऑटाेचालकालचा मृतदेह आढळल्याची घटना रविवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास समाेर आली. शनिवारी रात्री ७ ते रविवारी सकाळी ७ या कालावधीत या ऑटाेचालकाचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याचे पाेलिसांनी सांगितले. मृतऑटाेचालकाच्या डाेक्यावर, चेहऱ्यावर आणि अंगावर गंभीर जखमा आढळून आल्या आहेत. घटनेची माहिती औसा पाेलिसांना मिळाली असता, औसा उपविभागीय पाेलिस अधिकारी रामदास ईगवले, पाेलिस निरीक्षक सुनील रेजितवाड, स्थागुशाचे सहायक पाेलिस निरीक्षक राठाेड यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचानामा केला. 

याबाबत इम्रान मुख्तार तांबाेळी (रा. औसा जि. लातूर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून औसा ठाण्यात गुरनं. ४२३ / २०२३ कलम ३०२ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. तपास पाेलिस निरीक्षक सुनील रेजितवाड करत आहेत.

Web Title: Auto driver stoned to death, incident on Latur-Ausa highway