Crime News: पत्नी आणि भाचा बेडरुममध्ये नको त्या अवस्थेत होते. त्याचवेळी मामा आला अन् बेडरुममधील दृश्य बघून त्याला धक्काच बसला. त्यानंतर वादावादी झाली. यातून पत्नी आणि भाच्याने मामाची हत्या केली. पोलीस चौकशीतून अशी माहिती समोर आली की, मयताच्या पत्नीचे भाच्यासोबत मागील काही वर्षांपासून विवाहबाह्य संबंध आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
उत्तर प्रदेशातील फिरोजाबादमध्ये ही घटना घडली आहे. फिरोजाबाद जिल्ह्यातील खैरगढ गावात एका महिलेने पतीच्या भाच्यासोबतच विवाहबाह्य संबंध ठेवले. गेल्या अनेक वर्षांपासून दोघे रिलेशनमध्ये असल्याचेही चौकशीतून समोर आले आहे.
पोलिसांनी सांगितले की, सतेंद्र सिंह हा व्यक्ती बुधवारी (१५ जानेवारी) मृतावस्थेत आढळून आला. त्यामुळे त्याचे कुटुंबीय हादरले. या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी मृत्यूचा तपास सुरू केला. सतेंद्रची गळा दाबून हत्या करण्यात आल्याचे समोर आले.
त्यामुळे पोलिसांनी त्याच्या कुटुंबातील व्यक्तीची चौकशी सुरू केली. पोलीस चौकशी करत असल्यामुळे सतेंद्रची पत्नी घाबरली. त्यामुळे पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आणि या घटनेबद्दल विचारलं. घाबरून तिने सर्व घटना सांगितली.
पती-पत्नी आणि भाचा, काय घडलं?
मयत सतेंद्रच्या पत्नीने पोलिसांना सांगितले की, गेल्या काही वर्षांपासून तिचे आणि सतेंद्रचा भाचा गोविंदसोबत प्रेमसंबंध आहेत. मंगळवारी रात्री सतेंद्र घरी नव्हता. त्यादिवशी मी आणि गोंविदसोबत बेडरुममध्ये होते. त्याचवेळी सतेंद्र आला आणि त्यांना नको त्या अवस्थेत बघितले.
त्यानंतर तिघांमध्ये जोरदार वाद झाला. पती सगळ्यांना आपल्या अनैतिक संबंधाबद्दल सांगेल, या भीतीने त्या दोघांनी सतेंद्रची हत्या केली.