शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

अगुस्ता वेस्टलँड प्रकरण : व्यापारी श्रवण गुप्ता यांच्यासह सहा जणांच्या घरांवर ईडीची छापेमारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2020 15:22 IST

ईडीने २०१८ साली श्रवण गुप्ताची 10.28 कोटींची मालमत्ता जप्त केली होती. श्रवण गुप्ता यांच्यावर स्विस बँकेत अघोषित ठेवी जमा केल्याचा आरोप होता.

ठळक मुद्देईडीने मनी लॉन्ड्रिंग कायद्यांतर्गत हे पाऊल उचलले आहे. छापेमारी दरम्यान, गुप्ता व त्यांच्या प्रवक्त्यांकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. जबाबात अशी माहिती देण्यात आली आहे की, सध्या इमार इंडिया दुबईच्या तिमार प्रॉपर्टीज पीजेएससी अंतर्गत येते.

अगुस्ता वेस्टलँड व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) व्यापारी श्रवण गुप्ता यांच्यासह सहा जणांच्या घरांवर छापा टाकला आहे. ही माहिती सरकारी अधिकाऱ्याने दिली, श्रवण गुप्ता हे रिअल इस्टेट कंपनी इमार एमजीएफचे माजी व्यवस्थापकीय संचालक आहेत.श्रवण गुप्ता यांच्या घराची झाडझडती घेण्यात आली, जेणेकरुन ३३२७ कोटी रुपयांच्या घोटाळ्याबद्दल कोणते ना कोणते पुरावे सापडतील, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, ईडीने मनी लॉन्ड्रिंग कायद्यांतर्गत हे पाऊल उचलले आहे. छापेमारी दरम्यान, गुप्ता व त्यांच्या प्रवक्त्यांकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. २०१६ मध्ये त्यांच्याकडे याप्रकरणी प्रश्न विचारण्यात आले होते.सध्या श्रवण गुप्ता इमार एमजीएफ या रिअल इस्टेट कंपनीचा प्रवर्तक आहे. इमार कंपनीच्यावतीने जबाब नोंदविण्यात आला आहे. सध्या श्रवण गुप्ता कंपनीच्या कोणत्याही भूमिकेत नाहीत. जबाबत म्हटले आहे की, काही वर्षांपूर्वी इमार आणि एमजीएफ वेगळे झाले होते आणि श्रवण गुप्ता यांची इमार इंडियामध्ये कोणतीही भूमिका नाही.जबाबात अशी माहिती देण्यात आली आहे की, सध्या इमार इंडिया दुबईच्या तिमार प्रॉपर्टीज पीजेएससी अंतर्गत येते. कंपनीने आपल्या जबाबत एक जबाबदार कॉर्पोरेट कंपनी असल्याने इमार इंडिया भारत सरकारला पूर्ण सहकार्य करेल, असे म्हटले आहे. अधिकाऱ्यांना विश्वास आहे की, लाचखोरीची रक्कम भारतात आणण्यात सर्वात मोठा हात असलेल्या युरोपियन गुइडो हेचके यांच्याशी श्रवण गुप्ता यांचे संबंध आहेत. २००९ साली गुइडो इमार-एमजीएफमध्ये संचालक म्हणून कार्यरत होते. ईडीने अगुस्ता वेस्टलँड व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर खरेदीवर पैशांची उधळपट्टी केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ईडीने २०१८ साली श्रवण गुप्ताची 10.28 कोटींची मालमत्ता जप्त केली होती. श्रवण गुप्ता यांच्यावर स्विस बँकेत अघोषित ठेवी जमा केल्याचा आरोप होता.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

नग्नावस्थेत फ्रिजमध्ये आढळले महिलेचे अर्धवट शरीर, बलात्कार करून निर्घृण हत्या केल्याची शक्यता 

 

Shocking! भारत-चीन सीमेवर IES अधिकारी बेपत्ता, घरात सुरू होती लगीनघाई

 

लज्जास्पद! अपहरण करून मुलीवर बलात्कार; चौघांना अटक, मुख्य आरोपी भाजपा पंच फरार

 

विवस्त्र करून तरुणाला बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी घेतले दोघांना ताब्यात

 

थरारक! दुचाकी पार्किंगच्या वादातून महिलेची केली चाकू भोसकून हत्या 

टॅग्स :Agusta Westland Scamअगुस्ता वेस्टलँड घोटाळाEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयraidधाड