शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

तरुणाने छेड काढल्याने अल्पवयीन मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2020 22:27 IST

संशयितास अटक : फोटो व्हायरल करण्याची धमकी

ठळक मुद्दे एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणाऱ्या १६ वर्षीय मुलीला सचिन पवार हा नेहमीच घरी येऊन त्रास देत होता.पीडितेच्या आईने फिर्याद दिली त्यानुसार सचिन पवारविरुध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव : छेड काढल्याची तक्रार पोलिसात दिली तर फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याने घाबरलेल्या अल्पवयीन मुलीने फरशी पुसण्याचे औषध प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली. दरम्यान, याप्रकरणी सचिन रामदास पवार (रा.अयोध्या नगर) याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणाऱ्या १६ वर्षीय मुलीला सचिन पवार हा नेहमीच घरी येऊन त्रास देत होता. जबरदस्तीने छेड काढत होता. ६ जून रोजी देखील त्याने असाच प्रकार केला असता पीडित बालिकेच्या आईने त्याला जाब विचारला असता मी तुमच्या घरी येत नाही, फक्त घराकडे बघतो असे सांगितले होते. त्यानंतर सोमवारी सकाळी ११ वाजता देखील पीडितेची आई वरच्या मजल्यावर असताना सचिन हा घरी आला. त्याची चाहूल लागताच त्या खाली आल्या असता त्याने पीडितेचा हात धरला होता. तिने धक्का देऊन त्याला लांब केले. या झटापटीत पीडितेच्या आईलाही दुखापत झाली. दरम्यान, या प्रकरणाची पोलिसात तक्रार दिली तर तुम्हाला बघून घेईन व तुझे फोटो व्हायरल करेल अशी धमकी त्याने दिली. त्यामुळे घाबरलेल्या पीडितेने घरात फरशी पुसण्याचे औषध प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. पीडितेला दवाखान्यात दाखल करण्यात आले असून तेथे पोलिसांनी तिचा जबाब नोंदविला. पीडितेच्या आईने फिर्याद दिली त्यानुसार सचिन पवारविरुध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पळून जाताना घेतले ताब्यातगुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांनी संशयिताला अटक करण्याचे आदेश दिल्याने सहायक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, रामकृष्ण पाटील, इम्रान सय्यद, असीम तडवी, सचिन पाटील व योगेश बारी यांच्या पथकाने अयोध्या नगर गाठले. पोलिसांना पाहून पळून जात असतानाच सचिन याला ताब्यात घेण्यात आले. रात्री त्याला अटक करण्यात आली आहे.

 

अन्य महत्वाच्या बातम्या :

धक्कादायक! अनुकंपा नोकरी मिळविण्यासाठी पित्याला ठार मारले; आई, भावाचीही मदत

 

खूनप्रकरणी निलंबित पोलीस अधिकारी पुन्हा सेवेत दाखल

 

३० वर्षांपूर्वी झाला होता कथित 'मृत्यू'; बँक फसवणुकीत CBIची तपासाची चक्रे फिरली अन् निघाला जिवंत

 

आयएएस अधिकाऱ्यावर महिलेने केला लैंगिक शोषणाचा आरोप, मुख्यमंत्र्यांनी केले निलंबित 

 

उमरग्यात खून करुन पुण्यात आलेल्या दोघांना अटक

 

लॉकडाऊन दरम्यान स्पा सेंटरच्या नावाखाली चालवले जात होते सेक्स रॅकेट

 

चोरांनी दिलं पोलिसांना खुलं आव्हान; फिल्मी स्टाईलनं सांगितली चोरीची वेळ अन् तारीख

 

युद्ध आमुचे सुरू... जम्मू-काश्मीरमध्ये सहा महिन्यात 93 दहशतवाद्यांना कंठस्नान

टॅग्स :MolestationविनयभंगPoliceपोलिसArrestअटकJalgaonजळगावSuicideआत्महत्या