शहरं
Join us  
Trending Stories
1
निकालानंतर उद्धव ठाकरे पुन्हा भाजपासोबत जातील?; शरद पवारांचं मोठं विधान
2
बुद्धिबळपटू तनिषा बोरामणिकरने बारावीत मिळवले १०० टक्के; पुढचे टार्गेट CA, त्यानंतर UPSC
3
फडणवीस अचानक पुण्याच्या पोलीस आयुक्तालयात धडकले; अपघात प्रकरणी कारवाईचा धडाका?
4
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
5
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
6
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
7
पुणे अपघात: आमदाराने पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप, ३ दिवसांनंतर अजित पवार ॲक्शन मोडवर!
8
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
9
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
10
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
11
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता
12
IPL 2024 Playoffs Qualifier 1 KKR vs SRH: क्वालिफायर सामन्याआधी उडाली खळबळ, स्टेडियमच्या आत-बाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, प्रकरण काय?
13
हेमंत सोरेन अन् अरविंद केजरीवाल यांची प्रकरणे वेगवेगळी; ईडीचा सुप्रीम कोर्टात जामिनाला विरोध
14
Gold Price Today : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! सोन्याचे दर पुन्हा घसरले
15
महेंद्रसिंग धोनी आम्हाला कळवेल...! कॅप्टन कूलच्या निवृत्तीच्या चर्चांवर CSK ने दिले महत्त्वाचे अपडेट्स
16
PM मोदींच्या वक्तव्यानंतर सरकारी कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी, कोल इंडियाबाबत ब्रोकरेज बुलिश, म्हणाले...
17
T20 WC 2024: "रिंकू एकमेव खेळाडू आहे जो...", 'भज्जी'ने टीम इंडियासाठी सांगितली रणनीती
18
Closing Bell: शेअर बाजाराचं मार्केट कॅप $५ ट्रिलियन पार; मेटल शेअर्समध्ये तेजी, बँक-आयटी घसरले
19
एका सेक्स वर्करमुळं २११ ग्राहकांची झोप उडाली; पोलीस करतायेत प्रत्येकाला कॉल
20
हिंदी सोडा 'या' साऊथ अभिनेत्याकडे आहे कोट्यवधींची संपत्ती, बुर्ज खलिफामध्ये फ्लॅट अन्...

अनैतिक संबंधाच्या संशयावरुन तरुणाच्या खुनाचा प्रयत्न; जांभुळवाडी येथील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 3:20 PM

याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी केली तिघांना अटक

पुणे : अनैतिक संबंधाच्या संशयावरुन तरुणाला अडवून ५ जणांनी त्याच्यावर काेयत्याने वार करुन खुनाचा प्रयत्न केल्याचा प्रकार जांभुळवाडी येथे घडला. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.किरण कैलास इंगळे (वय २२), शेखर अंकुश दिघे (वय २०) आणि जय पांडुरंग निकम (वय २१, तिघे रा. विठ्ठलनगर, जांभुळवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. भाऊ चोरघे आणि रवी इंगळे यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी अजित ओंबासे (वय ३४, रा. आंबेगाव खुर्द) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भाऊ अमर ओंबासे हा दुचाकीवरुन रविवारी पहाटे मार्केटयार्ड येथे कामाला जात होता. त्यावेळी जांभुळवाडी रोडवरील लिपाणे वस्ती येथे पाच जण कारमधून आले. त्यांनी अमर याच्या दुचाकीला धडक देऊन खाली पाडले. अमर हा एका महिलेबरोबर बोलत असल्याच्या संशयावरुन आरोपींनी त्याला शिवीगाळ करुन कोयत्याने डोक्यात, दोन्ही हाताचे मनगटावर, पाठीवर सपासप वार केले. त्यात अमर गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक अर्जुन बोत्रे अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक