शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

वसईत भररस्त्यात वाहतूक पोलिसाच्या हत्येचा प्रयत्न; मारहाण केली, डोक्यात दगड घातला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 20:54 IST

२१ वर्षीय अभिषेक जैस्वारने केलेल्या हल्ल्यात ५२ वर्षीय वाहतूक पोलीस जसवंत वळवी गंभीर जखमी

लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा (मंगेश कराळे): एका दुचाकीस्वाराने कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसाला भररस्त्यात मारहाण करत डोक्यात दगड घालून हत्येचा प्रयत्न केला. वसईच्या गोखिवरे नाक्यावर मंगळवारी दुपारी ही घटना घडली. या हल्ल्यात वाहतूक पोलीस जसवंत वळवी हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चार तरुण एकाच दुचाकीवरून येत असल्याने त्यांना पोलिसाने अडवले होते.

धुळवडी निमित्ताने मंगळवारी वाहतूक पोलिसांनी शहरात ठिकठिकाणी तपासणी मोहीम सुरू केली होती. वसई वाहतूक विभागाचे सहाय्यक फौजदार जसवंत वळवी (५२) हे मंगळवारी वसई पूर्वेच्या गोखविरे रेंज नाक्यावर बंदोबस्तासाठी होते. त्यांच्यासोबत अन्य एक पोलीस होता. दुपारी साडे तीनच्या सुमारास एका दुचाकीवरून ४ जण जात असलेले वळवी यांना दिसले. त्यामुळे वळवी यांनी ती दुचाकी थांबवली. दुचाकीस्वार अभिषेक जैस्वार (२१) याने वळवी यांच्याशी हुज्जत घातली. अचानक तो आक्रमक झाला आणि त्याने जवळ असलेला मोठा दगड उचलून वळवी यांच्या डोक्यात घातला. ते पाहून सोबत असलेले दुसरे पोलीस मदतीला आले. मात्र जैस्वार आक्रमकपणे दगडाने वळवी यांच्या डोक्यावर मारत होता. या हल्ल्यात वळवी रक्तबंबाळ झाले. त्यांच्या डोक्याला तीन ठिकाणी गंभीर दुखापत झाली. वळवी यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

वालीव पोलिसांनी आरोपी अभिषेक जैस्वार याला अटक केली आहे. त्याच्याविरोधात हत्येचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा आणणे तसेच मोटार वाहन अधिनियमाच्या कलमाअंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Vasai: Traffic Cop Attacked, Stone Thrown at Head in Broad Daylight

Web Summary : In Vasai, a traffic policeman was brutally attacked and seriously injured after stopping four individuals on a motorcycle. One suspect, Abhishek Jaiswar, has been arrested for attempted murder and obstructing a public servant. The incident occurred during a traffic check on Gokhivre Naka.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीtraffic policeवाहतूक पोलीस