मेहुण्यांना कारने धडक देऊन हत्येचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2023 10:20 IST2023-01-29T10:20:35+5:302023-01-29T10:20:51+5:30

आपल्या पत्नीच्या दोन भावांना कारने पाठीमागून धडक देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी फैझल नाझीम अंसारी (२६) याच्याविरोधात तळोजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

Attempted murder by hitting brother-in-law with a car | मेहुण्यांना कारने धडक देऊन हत्येचा प्रयत्न

मेहुण्यांना कारने धडक देऊन हत्येचा प्रयत्न

नवीन पनवेल : आपल्या पत्नीच्या दोन भावांना कारने पाठीमागून धडक देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी फैझल नाझीम अंसारी (२६) याच्याविरोधात तळोजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, शहानवाज अब्दुल मलिक अन्सारी (१९) याची मोठी बहीण शहरीन हिचा विवाह २०२२ मध्ये फैझल नाझीम अंसारी यांच्यासोबत झाला. त्यांच्यात वारंवार वाद होत होते. यातून त्यांच्या समोरच नाझीमने शहरीनला मारहाण केली. त्यामुळे तळोजा पोलिस ठाण्यात अदाखलपत्र गुन्हा दाखल केला. यानंतर ते शहरीनला घरी घेऊन आले.

परवा शहनवाज आणि भाऊ मोहम्मद हे नमाजवरून घरी जात असताना एका कारने भरधाव वेगाने येऊन त्यांना पाठीमागून धडक दिली. यावेळी त्यांनी गाडीचा क्रमांक पाहिला असता ती फैझल यांची असल्याचे दिसले. त्यानंतर फैझल गाडी घेऊन पळून गेले. गाडीने पाठीमागून धडक दिल्याने शहानवाज आणि त्यांचा भाऊ मोहम्मद हे दोघे जखमी झाले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

Web Title: Attempted murder by hitting brother-in-law with a car