मेडिकल स्टोअरसाठी बोगस परवाना देणारी टोळी अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2019 15:15 IST2019-02-22T15:12:07+5:302019-02-22T15:15:40+5:30
सहा आरोपींना २६ फेब्रुवारीपर्य़ंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच पोलीस याबाब अधिक तपास करत आहे.

मेडिकल स्टोअरसाठी बोगस परवाना देणारी टोळी अटकेत
ठाणे - औषध विक्रीच्या दुकानासाठी (मेडिकल स्टोअर) बोगस परवाना देणाऱ्या टोळीचा ठाणे गुन्हा शाखेने पर्दाफाश केला आहे. या कारावाईत सहा जणांना अटक करण्यात आली आहे. नरेंद्र गेहलोत, हरिशंकर जोशी, दीपक विश्वकर्मा, प्रेमचंद चौधरी, प्रवीण गड्डा आणि महेंद्र भानूशाली अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या सहा आरोपींना २६ फेब्रुवारीपर्य़ंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच पोलीस याबाब अधिक तपास करत आहे.
अटक करण्यात आलेले आरोपी बोगस प्रमाणपत्राच्या आधारे गेल्या कित्येक दिवसांपासून नवी मुंबई, ठाणे, मुलुंड, भिवंडी या शहरात औषध विक्रीचा व्यवसाय करत होते. या कारवाईत वैद्यकीय प्रमाणपत्रांसह दहावी-बारवीचे बनावट प्रमाणपत्र देखील आढळून आले आहेत. ही टोळी महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये देखील कार्यरत असल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तविण्यात आला आहे.