गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यासमोर महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2022 22:20 IST2022-05-19T22:18:18+5:302022-05-19T22:20:01+5:30
Jitendra Awhad News: राज्य सरकारमधील गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यासमोर एका महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला मरिन ड्राईव्ह पोलिसांनी ताब्यात घेता आहे.

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यासमोर महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न
मुंबई - राज्य सरकारमधील गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यासमोर एका महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला मरिन ड्राईव्ह पोलिसांनी ताब्यात घेता आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सदर महिलेच्या घराचा प्रश्न प्रलंबित आहे. हा प्रश्न मार्गी न लागल्याने तिने टोकाचे पाऊल उचलत मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या घरासमोर आत्महत्येचा प्रयत्न केला. जितेंद्र आव्हाड यांच्या शिवगड या शासकीय बंगल्यासमोर हा प्रकार घडला सदर महिला अंगावर रॉकेल ओतून स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न करत असतानाच मरिन ड्राईव्ह पोलिसांनी प्रसंगावधान राखत तिला ताब्यात घेतले. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.