शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या माजी आमदाराचा महावितरण कार्यालयात गळफास लावून घेण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2021 20:52 IST

Attempt to Suicide : नेवासे तालुक्यातील शेतकऱ्यांचेमी  शेतीपंपाची वीज जोडणी महावितरण प्रशासनाकडून खंडित करण्यात येत आहे. या विरोधात भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी आज नेवासे महावितरण कार्यालयात स्वत:ला गळफास लावून घेण्याचा प्रयत्न केला.

नेवासा (जि.अहमदनगर)  : महाराष्ट्रात महावितरण प्रशासनाकडून सक्तीची थकीत वीज बिल वसुली मोहीम राबविली जात आहे. या विरोधात भाजपचे नेते आंदोलने करत आहेत. नेवासे तालुक्यातील शेतकऱ्यांचेमी  शेतीपंपाची वीज जोडणी महावितरण प्रशासनाकडून खंडित करण्यात येत आहे. या विरोधात भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी आज नेवासे महावितरण कार्यालयात स्वत:ला गळफास लावून घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे महावितरण कार्यालयात एकच गोंधळ उडाला त्यांच्या गळ्याचा फास काढण्यात आला नंतर त्यांना एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. वीज बिलांची  सक्तीची वसुली सुरू आहे. या संदर्भात बाळासाहेब मुरकुटे यांनी महावितरण अधिकाऱ्यांना वेळोवेळी निवेदने देऊनही महावितरण अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने आज मुरकुटे यांनी नेवासे महावितरण कार्यालयामध्ये जाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मुरकुटे यांनी दोरी लावून गळफास घेण्याचा प्रयत्न करताच त्यावेळी त्यांच्या समवेत असलेल्या कार्यकर्त्यांनी त्यांना थांबविल्याने अनर्थ टळला.

 वीज वितरण कंपनीच्या कार्यालयातच वीज प्रश्नाबाबत भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली नेवासे भाजपचे पदाधिकारी हे महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करत होते. मुरकुटे यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांनी महावितरण कार्यालयात तीन तास ठिय्या आंदोलन केले. नेवासे भाजपचे शिष्टमंडळाने शेतकऱ्यांकडून पाच हजार रुपये न घेता तीन हजार रुपये भरून घ्यावेत ही मागणी केली होती. मात्र यावेळी अधिकाऱ्यांनी या मागणीला केराची टोपली दाखवल्याने संतप्त झालेल्या मुरकुटे यांनी महावितरण कंपनीच्या कार्यालयातच शेतकऱ्यांच्या वीज तोड प्रकरणी गळफास घेण्याचा प्रयत्न केला. त्यांना भाजप कार्यकर्त्यांनी थांबविले. त्यांच्या बरोबर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे हे ही उपस्थित होते. बाळासाहेब मुरकुटे यांचा श्वास रोखला गेल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती उत्तम असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :mahavitaranमहावितरणBJPभाजपाMLAआमदारAhmednagarअहमदनगरPoliceपोलिसFarmerशेतकरी