Attack with weopan on youth from old issue | मोशी येथे पूर्ववैमनस्यातून तरूणावर वार
मोशी येथे पूर्ववैमनस्यातून तरूणावर वार

मोशी : पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून तरुणाच्या गळ्यावर दोन जणांनी धारदार शस्त्राने वार केले. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना सोमवारी  सकाळी सातच्या सुमारास बोऱ्हाडेवाडी मोशी येथे घडली.
एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेजस भोपालसिंग भूल (वय १८, रा. फोर्स मोटार कॉलनी, थरमॅक्स चौक, आकुर्डी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्याने  फिर्याद दिली आहे. रितेश राम (पूर्ण नाव माहिती नाही) तसेच त्याचा अनोळखी साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी सकाळी सातच्या सुमारास फिर्यादी तेजस हा बोऱ्हाडेवाडी, मोशी येथील मातेरे हाऊसजवळील मोकळ्या मैदानात खेळून झाल्यावर आपल्या गाडीकडे चालले होते. त्यावेळी तिथे आलेल्या आरोपींनी पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून तेजस याच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केले. त्यानंतर आरोपी पसार झाले.

Web Title: Attack with weopan on youth from old issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.