भाजप कार्यकर्ते अशोकराव शेजुळ यांच्यावर अज्ञाताकडून हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2023 11:45 IST2023-03-07T11:45:09+5:302023-03-07T11:45:39+5:30

माजलगाव येथील भाजपा कार्यकर्ते अशोकराव शेजुळ यांच्यावर शाहूनगर येथे ते आपल्या स्कुटीवर जात होते.

Attack on BJP leader Ashokrao Shejul by unknown persons in majalgaon beed | भाजप कार्यकर्ते अशोकराव शेजुळ यांच्यावर अज्ञाताकडून हल्ला

भाजप कार्यकर्ते अशोकराव शेजुळ यांच्यावर अज्ञाताकडून हल्ला

माजलगाव - येथील भाजपा कार्यकर्ते अशोक शेजुळ यांच्यावर मंगळवारी सकाळी साडेदहाच्या दरम्यान  शाहुनगर येथे अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला करून जबर जखमी केले. त्यांच्यावर शहरातील शिवतिर्थ हॉस्पिटल येथे उपचार चालू आहे.

माजलगाव येथील भाजपा कार्यकर्ते अशोकराव शेजुळ यांच्यावर शाहूनगर येथे ते आपल्या स्कुटीवर जात असताना मोटरसायकल वरून पाठीमागून आलेल्या पाच ते सहा अज्ञात हल्लेखोरांनी राॅडच्या साह्याने त्यांचा हातापायावर जबर मार देऊन एक पाय मोडला आहे. त्यांच्या डोक्यावर  जबर मार लागला असून त्यांच्यावर शहरातील खाजगी रूग्णालयात  उपचार चालू असून माजलगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांनी त्यांची भेट घेऊन विचारपूस केली. ज्या ठिकाणी हल्ला झाला आहे त्या ठिकाणी पोलीस जाऊन चौकशी करत आहेत.

Web Title: Attack on BJP leader Ashokrao Shejul by unknown persons in majalgaon beed