शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

जितेंद्र सावंत यांच्यावर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 00:37 IST

३४ जणांविरोधात गुन्हा दाखल : राजकीय वैमनस्यातून घडली घटना?

लोकमत न्यूज नेटवर्कदासगाव : रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य जितेंद्र सावंत यांच्यावर गुुुरुवारी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास महाड तालुुक्यातील त्यांच्याच कोकरे गावातील एका गटाने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यामध्ये सावंत जखमी झाले असून, हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीचीही तोडफोड केली आहे. या प्रकरणी सावंत यांनी हल्लेखोरांच्या विरोधात तक्रार केली आहे. महाड तालुका पोलिसांनी कोकरे गावांतील ३४ जणांच्या विरोधांत गुन्हा दाखल केला आहे.३० जुलै रोजी तालुक्यातील दाभोळ खलाटीवाडीमध्ये तंटामुक्ती अध्यक्ष आबाजी रामा नाडकर यांनी ग्रामस्थांच्या सभेचे आयोजन केले होते. या सभेचे आमंत्रण जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र सावंत यांनाही देण्यात आले होते. गावातील काही किरकोळ समस्या आणि वादावर या सभेमध्ये सविस्तर चर्चा करण्यात येऊन वाद मिटविले. सभेचे कामकाज रात्री १० वाजण्याच्या सुमाराला संपल्यानंतर सावंत नातेवाईक विजय सावंत, स्वराज सावंत, निर्जता नितेश चिवीलकर यांच्याबरोबर गाडीतून घरी जात होते. थोडे अंतर गेल्यानंतर त्यांच्या गाडीजवळ तीस ते चाळीस जणांनी अचानक गराडा घातला आणि शिवीगाळ करत धक्कबुुुकी केली. यात सावंत आणि नातेवाईक जखमी झाले.गाडीचेही केले नुकसानहल्लेखोरांनी गाडीचेही नुकसान केले, सर्व हल्लेखोर कोकरे गावातील असून, राजकीय द्वेषातून प्राणघातक हल्ला करण्यात आला असल्याचे सावंत यांनी सांगितले. या प्रकरणी त्यांनी महाड तालुका पोलीस ठाण्यात ३४ जणांच्या विरोधात तक्रार दाखल केली .