शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

संशयित दहशतवादी मोमीनने नाल्यात फेकलेला मोबाईल एटीएसला तीन तुकडयात सापडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2021 00:18 IST

ATS News : एटीएसकड़ून झाडाझडती सुरु

मुंबई : धारावीतून जान मोहम्मद अली शेख उर्फ समीर कालियाच्या अटकेनंतर राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) मोठी कारवाई करत मुंबईच्या जोगेश्वरी भागातून ज़ाकिर हुसेन शेखला बेडया ठोकल्या. शेखपाठोपाठ एटीएसनेमुंब्रा येथून रिझवान इब्राहीम मोमीन (४०) याला रविवारी ताब्यात घेत अधिक चौकशी सुरु केली आहे. 

एटीएसने दिलेल्या माहितीनुसार, अन्थोंनी उर्फ अन्वर उर्फ अनस आणि शेख विरोधात बेकायदेशीर कृत्य करण्याचा कट आखण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १७ तारखेला गुन्हा दाखल करण्यात आला. त्यापाठोपाठ शेख विरोधात लुक आउट नोटीस जारी करत त्याला १८ तारखेला अटक केली.         शेख हा अंडरवर्ल्डशी संबंधित आहे. शेखचा भाऊ शाकीर शेख हा पाकिस्तानमध्ये असून तो दाऊदचा भाऊ अनिस इब्राहिम याचा खास हस्तक आहे. शाकीरच्या माध्यमातून शेख हा अनिस इब्राहिमच्या सातत्याने संपर्कात होता. त्यामुळे तो मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्याही रडारवर तो सुरुवातीपासूनच होता. गुन्हे शाखेने एका प्रकरणात शेखला यापूर्वी अटक केली होती.     अनिस इब्राहिमच्या सांगण्यावरुनच शेख याने जान मोहम्मदला या दहशतवादी हल्ल्याच्या योजनेमध्ये सामिल केले होते. त्यामुळे शेख हा अंडरवर्ल्डमधील स्लीपर सेल पद्धतीने काम करत असून जान मोहम्मदला तो लॉजिस्टिक सपोर्ट देत असल्याचे एटीएसच्या तपासात समोर आले आहे. तसेच, शेखच्या सांगण्यावरुनच जान मोहम्मद दिल्लीसाठी रवाना झाला होता, अशी माहिती मिळते आहे. सोमवारी न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठड़ी सुनावली आहे.       शेख पाठोपाठ या गुह्यांत मोमीनचा सहभाग समोर येताच, पथकाने रविवारी मुंब्रा येथून त्याला ताब्यात घेतले आहेत. त्याच्या घरातूनही महत्त्वपूर्ण दस्ताऐवज जप्त केल्याचे एटीएसकड़ून सांगण्यात आले.          शेखने मोमीनकड़े दिलेल्या मोबाईलची विल्हेवाट लावण्यासाठी मोमीनने तो तोडून जवळच्या नाल्यात फेकला. रविवारी अथक प्रयत्नाने नाल्यातून ३ तुकडयांंमध्ये मोबाईलचा शोध घेण्यास यश आले आहे.       मोमीन हा मुंब्राच्या चांदनगर येथील नुरी सोसायटीत भाड्याच्या घरात राहायचा. त्याने खाजगी शिकवणी सुरू केले होते. याआधी तो मुंबईत शिक्षक म्हणून काम करायचा अशी माहिती मिळत आहे. त्याच्याकड़े याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.

टॅग्स :Anti Terrorist Squadएटीएसmumbraमुंब्राTerrorismदहशतवादterroristदहशतवादी