एटीएसची कारवाई! ड्रग्ज तस्करीतून उभारलेल्या कोट्यवधीच्या साम्राज्यावर टाच
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2020 21:00 IST2020-11-27T20:57:52+5:302020-11-27T21:00:38+5:30
ATS Action : अटक करण्यात आलेल्या १३ आरोपींची बँक खाते ही गोठवली आहे. यात दाऊद गँगच्या हस्तकाचाही समावेश आहे.

एटीएसची कारवाई! ड्रग्ज तस्करीतून उभारलेल्या कोट्यवधीच्या साम्राज्यावर टाच
मुंबई : ड्रग तस्करीतून मिळालेल्या पैशातून उभारलेल्या कोट्यावधीचा साम्राज्यावर राज्य दहशतवादविरोधी पथकाने टाच आणली आहे. तसेच अटक करण्यात आलेल्या १३ आरोपींची बँक खाते ही गोठवली आहे. यात दाऊद गँगच्या हस्तकाचाही समावेश आहे.
महाराष्ट्र एटीएसच्या विक्रोळी युनिटने गेल्यावर्षी तब्बल तेरा सरक तस्करांना अटक केली. या कारवाईत पोलिसांनी १४६ किलो १४३ ग्रँम एमडी जप्त केला आहे. त्याची किंमत ५८ कोटी ५५ लाख ७२ हजार इतकी आहे. यात, अब्दुल रज्जाक कादर शेख, इरफान बादर शेख, सुलेमान जोहर शेख, जितेंद्र शरद परमार उर्फ आसिफ, नरेश मदन म्हसकर, सरदार उत्तम पाटील, जुबेर मोमिन, मोहम्मद सलीम अब्दुल हमीद मेमन, कैस सिद्दीकी, आवेश खान, मोहम्मद अझीस परयानी, मोहम्मद वसीम अब्दुल लतीफ शेख, मुस्तफा चारानिया उर्फ गुड्डू अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. त्यांच्याविरुद्ध दोषारोप पत्रही दाखल करण्यात आले आहेत. आरोपींनी एमडीच्या विक्रीतून वाहने, बंगले, गाळा आणि दागिने खरेदी केले आहेत. त्यांच्याकड़ून
१ कोटी ५५ लाख १९ हजार २९० रुपयांची रोकड़ही हस्तगत करण्यात आली आहे. तसेच ३ वाहनेही जप्त करण्यात आली आहेत. यातील पाटील याने सांगली येथे एमआयड़ीसी येथे ३ हजार १९५ चौरस मिटरचा गाळा खरेदी केला आहे. कैस याने २०१९ मध्ये रायगड मध्ये फ्लॅट आणि गाळा खरेदी केला आहे. याची एकूण किंमत ८० लाख ७५ हजार रुपये इतकी किंमत आहे. तर दाऊद गँगचा हस्तक असलेला आरोपी परयानी याच्याकड़ून ४१ लाख ४२ हजार किंमतीचे दागिने, ३ लाख २० हजार किंमतीचे विदेशी बनावटीचे घड़याळे, अमेरिकन डॉलर जप्त करण्यात आले आहेत. साफेमा अंतर्गत ही सर्व मालमत्ता गोठविण्यात आली आहे.