एटीएममध्ये पैसे भरणाऱ्या कर्मचाऱ्यांवर हल्ला, दोघांची हत्या करून लाखो रुपये पळवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 18:11 IST2025-01-16T18:09:45+5:302025-01-16T18:11:24+5:30
crime News: एटीएममध्ये पैस भरण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांवर हल्ला करत लाखो रुपयांची रक्कम लुटल्याची घटना घडली आहे.

एटीएममध्ये पैसे भरणाऱ्या कर्मचाऱ्यांवर हल्ला, दोघांची हत्या करून लाखो रुपये पळवले
ATM Looted: एसबीआय बँकेच्या एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांवर सशस्त्र हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. दोन सुरक्षा रक्षकांची हत्या करून हल्लेखोर गाडीतील ९३ लाख रुपये घेऊन फरार झाले. महाराष्ट्राला लागून असलेल्या कर्नाटक राज्यात ही घटना घडली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
दोन सुरक्षा रक्षकांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. कर्नाटकातील बिदर जिल्ह्यात घडलेल्या घटनेने खळबळ उडाली.
वर्दळ असणाऱ्या शिवाजी चौकात घडली घटना
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिदर शहरातील शिवाजी चौकात असलेल्या एसबीआय एटीएमबाहेर ही घटना घडली. गुरुवारी (१६ जानेवारी) सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
एजन्सीचे कर्मचारी गिरी व्यंकटेश आणि शिव काशिनाथ एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी आले होते. पैसे असलेली गाडी एटीएमच्या बाहेर आल्यानंतर सशस्त्र आलेल्या आरोपींनी हल्ला केला. हल्लेखोरांनी आधी सुरक्षा रक्षकांची गोळ्या घालून हत्या केली. आणि गाडीतील ९३ लाख रुपये रोख रक्कम घेऊन फरार झाले.
आठ गोळ्या, सुरक्षा रक्षकांचा जागेवरच मृत्यू
पोलिसांनी सांगितले की, हल्लेखोरांनी आठ गोळ्या झाडल्या. यात दोन्ही सुरक्षा रक्षकांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. गोळीबार झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधिकारी घटना घडलेल्या ठिकाणी पोहोचले. सगळीकडे नाकाबंदी करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, आरोपींचा शोध घेतला जात आहे.
आरोपींना शोधण्यासाठी दोन पोलीस पथके तयार करण्यात आली आहे. आरोपी कोण होते, याचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज बघितले जात आहे. लवकरच आरोपींना अटक केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.