विवाहित Boss सोबत अफेअर करणं युवतीच्या जीवावर बेतलं; एका षडयंत्राने सगळंच संपलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2023 09:08 IST2023-08-07T09:08:18+5:302023-08-07T09:08:45+5:30

२१ वर्षीय युवती रागिणीचं बंटी नावाच्या युवकासोबत अफेअर सुरू होतं. दोघेही नोएडा येथे एका कंपनीत प्रॉपर्टीचं काम करायचे

At UP, Girl was having an affair with boss, his wife planned the murder with her brother | विवाहित Boss सोबत अफेअर करणं युवतीच्या जीवावर बेतलं; एका षडयंत्राने सगळंच संपलं

विवाहित Boss सोबत अफेअर करणं युवतीच्या जीवावर बेतलं; एका षडयंत्राने सगळंच संपलं

गाझियाबाद – उत्तर प्रदेशातील गाझियाबाद इथं एका महिलेने पतीच्या प्रेयसीला गोळी झाडून तिची हत्या केली आहे. त्यानंतर मुलीचा मृतदेह पुलावरून खाली फेकून ती पसार झाली. दुसरीकडे आरोपीच्या पतीने पत्नीला वाचवण्यासाठी पुरावे मिटवण्याचे प्रयत्न केले. सध्या या संपूर्ण प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत. आतापर्यंत ५ जणांना या गुन्ह्याखाली अटक केली आहे. तर २ फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

हे लव्ह ट्रॅँगल प्रकरण गाझियाबादमधील आहे. २१ वर्षीय युवती रागिणीचं बंटी नावाच्या युवकासोबत अफेअर सुरू होतं. दोघेही नोएडा येथे एका कंपनीत प्रॉपर्टीचं काम करायचे. अनेक दिवसांपासून दोघांचे अफेअर सुरू होते. या दोघांच्या अफेअरची युवकाच्या पत्नीला माहिती मिळाली. तिने पतीसोबत या विषयावर वादही घातला. परंतु पतीनं पत्नीचं काही ऐकले नाही. पत्नी राखीने समजावूनही बंटीने प्रेयसी रागिणीला भेटणे बंद केले नाही. दोघांच्या प्रेमामुळे बंटी-राखीत भांडणे होऊ लागली.

त्यानंतर या प्रकरणाची माहिती राखीनं तिचा भाऊ अमितला दिली. मग या दोघांनी षडयंत्र आखत रागिणीच्य हत्येचे प्लॅनिंग केले. अमितने रागिणीला बहीण राखीच्या घरी भेटायला बोलावले. त्याने सहकाऱ्यांसोबत मिळून बळजबरीने हत्याराचा धाक दाखवत तिला हिंडन नदीशेजारी नेले. तिथे रागिणीला मारून टाकले. मग तिचा मृतदेह पुलावरून खाली फेकून तिथून पसार झाले. काही दिवसांनी युवतीचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. युवतीची नोएडा येथे राहणारी रागिणी म्हणून ओळख पटली. घटनेच्या दिवशीचे सीसीटीव्ह फुटेज पोलिसांच्या हाती लागले. त्यात मृत रागिणीला अमित त्याच्या कारमध्ये बसवून घरातून घेऊन जात असल्याचे दिसले.

५ आरोपींनी केली अटक

पोलिसांच्या तपासात या प्रकरणी ५ लोकांना अटक करण्यात आली. त्यात षडयंत्र रचणारी अमितची बहीण राखी, त्याचा मित्र करण, अंकुर आणि पती बंटीही सहभागी होता. सध्या २ आरोपी फरार आहेत. राखी आणि बंटीला पोलिसांनी अटक केलीय. कारण रागिणीच्या हत्येचं बंटीला कळाल्यानंतर त्याने पुरावे मिटवण्यासाठी पत्नीला मदत केली होती.

Web Title: At UP, Girl was having an affair with boss, his wife planned the murder with her brother