प्रियकराच्या सांगण्यावरून आई-मावशीचे आक्षेपार्ह फोटो काढले; मुलीच्या कृत्याने सगळेच चक्रावले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 15:36 IST2026-02-09T15:34:23+5:302026-02-09T15:36:39+5:30

बेंगळुरूमध्ये एका सुशिक्षित तरुणीने आपल्या प्रियकराच्या सांगण्यावरून स्वतःच्याच आईचे आणि मावशीचे आक्षेपार्ह फोटो त्याला पाठवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

At the request of her boyfriend, she took objectionable photos of her mother and aunt; the girl's actions shocked everyone! | प्रियकराच्या सांगण्यावरून आई-मावशीचे आक्षेपार्ह फोटो काढले; मुलीच्या कृत्याने सगळेच चक्रावले!

प्रियकराच्या सांगण्यावरून आई-मावशीचे आक्षेपार्ह फोटो काढले; मुलीच्या कृत्याने सगळेच चक्रावले!

आई-वडील आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी हवं ते करायला तयार असतात, पण त्याच प्रेमाचा गैरफायदा घेऊन एखादी मुलगी असं काही करेल, याचा विचारही कोणी केला नसेल. कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमध्ये एका सुशिक्षित तरुणीने आपल्या प्रियकराच्या सांगण्यावरून स्वतःच्याच आईचे आणि मावशीचे आक्षेपार्ह फोटो त्याला पाठवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पीडित आईने आपल्या मुलीसह तिच्या प्रियकराविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

अभ्यासाच्या बहाण्याने घेतला फोन अन् रचला कट

मिळालेल्या माहितीनुसार, ४९ वर्षीय तक्रारदार महिलेच्या मुलीने वर्षभरापूर्वी 'मला अभ्यासासाठी मोबाईल हवा आहे' असं सांगून वडिलांकडे हट्ट धरला होता. लेकीच्या शिक्षणासाठी वडिलांनी तिला फोन घेऊन दिला. मात्र, याच फोनचा वापर तिने आई आणि मावशीची अब्रू वेशीवर टांगण्यासाठी केला.

आई रूममध्ये आली अन् बिंग फुटलं!

काही दिवसांपूर्वी ही महिला घराचं काम करत असताना अचानक मुलीच्या खोलीत गेली. तेव्हा मुलगी एका तरुणाशी व्हिडिओ कॉलवर बोलत होती. आईला पाहताच तिने घाईघाईत फोन कट केला, ज्यामुळे आईला संशय आला. घरच्यांनी जेव्हा त्या तरुणाबद्दल विचारलं आणि फोनचा पासवर्ड मागितला, तेव्हा ती टाळाटाळ करू लागली. अखेर कुटुंबाने फोनचा पासवर्ड मिळवला आणि गॅलरी तपासली, तेव्हा त्यांना बसलेला धक्का काळजाचा ठोका चुकवणारा होता.

झोपेत असताना आईचे, तर अंघोळ करताना मावशीचे फोटो काढले

तक्रारीनुसार, तरुणीने तिच्या आईचे ती झोपलेली असताना अत्यंत अश्लील फोटो काढले होते. एवढंच नाही, तर आपल्या मावशीचे अंघोळ करतानाचे फोटोही तिने चोरून काढले होते. हे सर्व फोटो तिने वरुण नावाच्या तिच्या प्रियकराला पाठवले होते. वरुणनेच तिला असे फोटो पाठवण्यासाठी प्रवृत्त केल्याचे त्यांच्या चॅटिंगवरून समोर आले आहे.

वादावादी झाली आणि मुलगी घरातून पळाली!

हा सर्व प्रकार उघड झाल्यानंतर घरात मोठा वाद झाला. मात्र, आपल्याला केलेल्या कृत्याचा पश्चात्ताप होण्याऐवजी ती तरुणी कुटुंबाशीच वाद घालत राहिली. गेल्या आठवड्यात ती अचानक घरातून निघून गेली असून, आपल्याला वरुणशीच लग्न करायचे आहे, असा निरोप तिने दिला आहे. आता हतबल झालेल्या कुटुंबाने पोलिसांत धाव घेतली असून पोलीस सध्या फरार वरुणचा शोध घेत आहेत.

Web Title : बेटी ने परिवार को धोखा दिया: प्रेमी के लिए मां, चाची की अश्लील तस्वीरें खींचीं

Web Summary : बेंगलुरु की एक लड़की ने प्रेमी के कहने पर अपनी मां और चाची की आपत्तिजनक तस्वीरें चुपके से खींचीं। भेद खुलने पर मां ने पुलिस में शिकायत दर्ज कराई। बेटी प्रेमी से शादी करने भाग गई, पुलिस उसकी तलाश कर रही है।

Web Title : Daughter Betrays Family: Took Obscene Photos of Mother, Aunt for Boyfriend

Web Summary : Bengaluru girl secretly photographed her mother and aunt in compromising positions at her boyfriend's urging. The mother filed a police complaint after discovering the betrayal. The daughter has since run away to marry the boyfriend, who is now wanted by police.