शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
3
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
4
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
5
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
6
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
7
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
8
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
9
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
10
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
11
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
12
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
13
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
14
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
15
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
16
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
17
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
18
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
19
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
20
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 

ST कर्मचाऱ्यांच्या पैशांतून सदावर्तेंनी घेतल्या मालमत्ता! घरात सापडले नोटा मोजण्याचे मशीन; पोलिसांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 06:34 IST

सदावर्ते सध्या सातारा पोलिसांच्या कोठडीत आहेत.  सरकारी वकील प्रदीप घरत यांनी मंगळवारी न्यायालयात अनेक गौप्यस्फोट करत सदावर्तेच्या कोठडीसाठी अर्ज केला. 

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानावरील हल्ल्याप्रकरणी अटकेत असलेले वकील गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांकडून घेतलेल्या पैशांतून लाखोंची मालमत्ता खरेदी केल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात पुढे आल्याचे सरकारी वकिलांनी मंगळवारी न्यायालयात सांगितले. सदावर्ते यांच्या कोठडीसाठी पोलिसांनी पुन्हा गिरगाव कोर्टात अर्ज केला आहे. त्यानुसार, गिरगाव कोर्टाने सदावर्ते यांना बुधवारी न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले आहेत.

सदावर्ते सध्या सातारा पोलिसांच्या कोठडीत आहेत.  सरकारी वकील प्रदीप घरत यांनी मंगळवारी न्यायालयात अनेक गौप्यस्फोट करत सदावर्तेच्या कोठडीसाठी अर्ज केला. 

आरोपीचे म्हणणे आहे की, मी वकील आहे; मात्र २० वर्षांपासून ते वकिली करत असताना, याच महिन्यात त्यांनी गाडी घेतली, याच काळात त्यांनी मालमत्ता कशा घेतल्या? त्यामुळे हे सर्व संशयास्पद आहे. याचा अधिक तपास करणे गरजेचे असल्याचे घरत यांनी सांगितले. याच मालमत्तेच्या चौकशीसाठी त्यांची पुन्हा कोठडी मागण्यात आल्याचे नमूद केले. तसेच सदावर्तेंच्या घरात सापडलेल्या डायरीतही काही संशयास्पद नोंदी आढळून आल्या असून, त्याचीही पडताळणी सुरू असल्याचे सांगितले. तसेच त्यांच्या घरातून ३५ महत्त्वाची कागदपत्रेदेखील जप्त केले असून, त्याचाही तपास सुरू असल्याचे सांगितले.

या सोबतच त्यांच्या घरातून पोलिसांनी नाेटा  मोजण्याचे मशीनदेखील जप्त केल्याचे सांगितल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. त्यांनी  ही मशीन कशासाठी  व कधी घेतली? याबाबत अधिक तपास करायचा असल्याचेही त्यांनी सांगितले. 

मोबाइलही गायब... -- आरोपी सहकार्य करत असल्याचे आरोपींचे वकील सांगतात; मात्र अद्याप वापरत असलेला मोबाइल दिला नाही. - याच गायब असलेल्या मोबाइलमध्ये महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागू शकते. त्यामुळे त्यांनी मोबाइल स्वतःहून द्यावा किंवा कुठे टाकला हे सांगावे, असेही प्रदीप घरत यांनी नमूद केले. 

कोल्हापूर पोलिसांनाही हवा आहे ताबा -कोल्हापूर येथील एका प्रकरणात ताबा मिळावा म्हणून कोल्हापूर पोलिसांनीही गिरगाव कोर्टात दावा केला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात सदावर्ते यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. 

२५० डेपोंमधून पैसे केले गोळा -सदावर्ते यांच्या घरात नोटा मोजण्याचे मशीन सापडले आहे. त्या मशीनमधून ८५ लाख रुपये मोजले गेल्याचे आढळले आहे. २५० डेपोंमधून पैसे गोळा गेल्याचीही माहिती समोर आल्याने या प्रकरणाला आणखी वेगळे वळण लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

कसे केले पैसे गोळा? -प्रतिज्ञापत्राच्या नावाखाली सदावर्ते यांनी एक फॉर्म बनविला होता. त्याचे २५० रुपये आणि तिकीट फी ५० रुपये घेतले. हे पैसेदेखील लोकांना परत दिले नाही. यावेळी आरोपी संदीप गोडबोले यांच्या वकिलानेदेखील सदावर्ते यांची कोठडी द्यावी जेणेकरून तपास होईल, असे न्यायालयात सांगितले. 

२३ लाखांची कार खरेदी - - सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांकडून मिळालेल्या पैशांतून भायखळा, परळ येथे काही मालमत्ता खरेदी केल्याचे घरत यांनी सांगितले. तसेच, एक गाडीही घेतल्याचे नमूद केले. - केरळमधून १६ मार्चला २३ लाखांची गाडी खरेदी केली. मोहम्मद रफी नावाच्या व्यक्तीकडून ही कार खरेदी केली आहे. ओएलएक्सवर जाहिरात पाहून सदावर्ते यांनी संपर्क केला आणि आठवड्याभरातच ही कार खरेदी केली. - कारच्या खरेदीचे २३ लाख रुपये बँक खात्यात जमा केल्याचीही माहिती तपासात समोर आली आहे. 

- ६० लाखांची एक जागा सदावर्ते यांनी परळमध्ये खरेदी केली. भायखळा येथेही मालमत्ता खरेदी केली असल्याचे सरकारी वकिलांनी सांगितले. 

सदावर्ते पुन्हा हाजीर हो... -गिरगाव कोर्टाने गुणरत्न सदावर्ते यांना बुधवारी कोर्टात हजर राहण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे सदावर्ते यावर काय माहिती देतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

टॅग्स :PoliceपोलिसST Strikeएसटी संपCourtन्यायालय