सुरक्षा रक्षकावर प्राणघातक हल्ला; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2021 20:49 IST2021-08-25T20:48:26+5:302021-08-25T20:49:02+5:30
Assaulting Case : ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

सुरक्षा रक्षकावर प्राणघातक हल्ला; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
कल्याण - कल्याण पूर्वेत गेल्या काही दिवसांपासून गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. आता कल्याण पुर्वेतील मलंगगड रोड परिसरात सुरक्षारक्षावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये सुरक्षारक्षक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
निलेश घोष असे जखमी झालेल्या सुरक्षारक्षकाचे नाव असून त्यांच्यावर मुंबईतील सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घोष हे कल्याण पुर्वेतील कल्याण मलंग रस्त्यावर असलेल्या एका दुकानाबाहेर झोपलेले होते. मंगळवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून कल्याण पूर्वेत गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून हा परिसर यूपी बिहार होण्याच्या मार्गावर आहे की काय? असा सवाल निर्माण झाला आहे.
नारायण राणेंना हायकोर्टाचा दिलासा; कोणीतीही कारवाई न करण्याचे आदेशhttps://t.co/B2m7JUoALZ
— Lokmat (@MiLOKMAT) August 25, 2021