अभ्यास न केल्याने लहान मुलीला अमानुष मारहाण, शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2019 22:58 IST2019-07-09T22:58:25+5:302019-07-09T22:58:55+5:30

गृहपाठ न केल्याने चौथीत शिकणाऱ्या मुलीला खासगी शिकवणीच्या शिक्षिकेने अमानुष मारहाण केल्याची घटना घडली आहे.

assault of a little girl by not studying | अभ्यास न केल्याने लहान मुलीला अमानुष मारहाण, शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल 

अभ्यास न केल्याने लहान मुलीला अमानुष मारहाण, शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल 

नवी मुंबई - गृहपाठ न केल्याने चौथीत शिकणाऱ्या मुलीला खासगी शिकवणीच्या शिक्षिकेने अमानुष मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी नेरुळ पोलिसठाण्यात शिक्षिके विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र कारवाईकडे पोलीस चालढकल करत असल्याचा मुलीच्या वडिलांचा आरोप आहे.  

साक्षी शिनलकर (9) असे मारहाण झालेल्या मुलीचे नाव आहे. ती नेरुळ सेक्टर 10 येथील राहणारी असून सेक्टर 8 येथील घरगुती क्लासला जायची. सोमवारी तिने गृहपाठ न केल्याच्या कारणावरून क्लासच्या शिक्षिका गोम्स यांनी तिला अमानुष मारहाण केली. यामध्ये तिच्या संपूर्ण शरीरावर जखमा झाल्या आहेत. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर तिच्या पालकांनी नेरुळ पोलिसांकडे तक्रार केली. परंतु गुन्हा दाखल होऊन देखील शिक्षिकेला अटक करण्यात पोलीस चालढकल करत असल्याचा आरोप साक्षीचे वडील दत्तू शिणलकर यांनी केला आहे. तसेच चौकशीच्या बहाण्याने आपल्यालाच सुमारे तीन तास पोलिसठाण्यात बसवून ठेवल्याचाही संताप त्यांनी व्यक्त केला आहे.

 

Web Title: assault of a little girl by not studying

टॅग्स :Schoolशाळा