मास्कची विचारणा केल्याने संतप्त तरुणाने पोलिसाला केली शिवीगाळ; गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2021 19:26 IST2021-03-01T19:26:15+5:302021-03-01T19:26:50+5:30

Crime News in Ulhasnagar : याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात दोघा भावावर गुन्हा दाखल करण्यात आला.

Asking for a mask, the angry youth insulted the police and filed a case | मास्कची विचारणा केल्याने संतप्त तरुणाने पोलिसाला केली शिवीगाळ; गुन्हा दाखल

मास्कची विचारणा केल्याने संतप्त तरुणाने पोलिसाला केली शिवीगाळ; गुन्हा दाखल

ठळक मुद्देमास्कबाबत विचारणा केल्यावर आशिष व आकाश त्रिपाठी यांनी शिवीगाळ केल्याचा प्रकार उघड झाला.

सदानंद नाईक


उल्हासनगर : शहरातील श्रीराम चौकातून जाणाऱ्या तरुणाला विठ्ठलवाडी पोलिसांनी मास्कबाबत विचारणा केल्यावर आशिष व आकाश त्रिपाठी यांनी शिवीगाळ केल्याचा प्रकार उघड झाला. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात दोघा भावावर गुन्हा दाखल करण्यात आला.

 शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्य चौकासह अन्य ठिकाणी महापालिका पथक व पोलीस विना मास्क फिरणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करीत आहेत. कॅम्प नं-४ श्रीराम चौकात दुपारी विना मास्क जाणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी हटकले. संतप्त झालेला तरुण घरी जाऊन भावाला घेऊन आला. दोघे भावानी पोलिसाला विना मास्क जाताना का हटकले? याचा जाब विचारून पोलिसांना शिवीगाळ केली. याप्रकारचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्यावर एकच खळबळ उडाली. याप्रकरणी पोलिसांनी आशिष व आकाश त्रिपाठी भावा विरुधात गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. पोलीस व महापालिका पथकाने नागरिकां सोबत उद्धटपणे वागण्या ऐवजी सहानुभूतीपूर्वक वागावे. असे नागरिकांचे म्हणणे आहे.

Web Title: Asking for a mask, the angry youth insulted the police and filed a case